आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द कपिल शर्मा शो घेणार प्रेक्षकांचा निरोप:फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात ऑफ एअर होणार कपिल शर्माचा शो, नवीन सीझनसह परतणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा कॉमेडी शो नवीन सीझनसह छोट्या पडद्यावर लवकरच परतणार आहे.

विनोदवीर कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. द कपिल शर्मा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र कपिलच्या चाहत्यांनी निराश व्हायची गरज नाहीय. कारण वृत्तानुसार, हा कॉमेडी शो नवीन सीझनसह छोट्या पडद्यावर लवकरच परतणार आहे. मात्र यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या शोचे चित्रीकरण मध्यंतरी थांबले होते. जुलै 2020 मध्ये पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात झाली खरी, मात्र तेव्हा स्टुडिओत प्रेक्षक नव्हते. लाइव्ह प्रेक्षकांऐवजी कटआउट्स ठेऊन शूटिंग केले जात होते. हा शो सध्या वीकेंडला टेलीकास्ट होतोय.

ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टुडिओत प्रेक्षक नसतात. सध्या मोठ्या प्रमाणात चित्रपटदेखील रिलीज होत नाहीयेत, त्यामुळे बॉलिवूड कलाकारही पुर्वीसारखे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोवर येत नाहीयेत. त्यामुळे निर्मात्यांनी सध्या शोसाठी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा सर्व गोष्टी सामान्य होतील, तेव्हा शो देखील नव्या रुपात परत येईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल आणि गिन्नी आपल्या दुसर्‍या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कपिलला सध्या पत्नीसोबत क्वालिटी वेळ घालवायचा आहे. तोपर्यंत शोमध्ये अधिक एंटरटेनिंग कंटेंटदेखील मिळेल.

नेटफ्लिक्सवर दिसणार कपिल

कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर 20 कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला आहे. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एका भागात कृष्णाने हा गौप्यस्फोट केला होता. मात्र, नंतर ही केवळ गंमत असल्याचे नंतर सांगण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...