आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'कसौटी जिंदगी के'च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पार्थ समथन आणि एरिका फर्नांडिस स्टारर शो पुढील महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शोच्या सतत घसरत्या टीआरपीमुळे चॅनेलला हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.
प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, “कथानकातील बदलापासून नवीन पात्रांच्या प्रवेशापर्यंत, निर्माती एकता कपूर आणि तिच्या टीमने प्रेक्षकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे वेधण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र या बदलांचा टीआरपी चार्टवर फारसा चांगला फरक पडला नाही. पार्थ समथनने हा कार्यक्रम मध्यभागी सोडण्याच्या निर्णयामुळे चॅनल देखील काळजीत पडले. आतापर्यंत बरीच महत्त्वाची पात्रे बदलली गेली आहेत, पण चॅनल पुढील बदलांच्या बाजूने नाही. एकता कपूरने चॅनलची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र चॅनलला यापुढे हा कार्यक्रम पुढे नेण्याची इच्छा नाही. अखेर एकता कपूरने पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. तिने शोच्या क्रिएटिव्ह टीमला कथानक गुंडाळण्यास सांगितले आहे. शोचा शेवटचा भाग 24 ऑक्टोबर रोजी प्रसारित होईल."
सूत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, "कसौटी जिंदगी के 'च्या जागी आता 'साथ निभाना साथिया 2' ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचे निर्माते सध्या स्टार कास्टच्या शोधात आहे. मात्र साथियाच्या निर्मात्या रश्मि शर्मा यांनी चॅनलला आश्वासन दिले आहे की, या महिन्याच्या अखेरीस ते चित्रीकरणाला सुरुवात करतील. प्लानिंगनुसार 'साथ निभाना साथिया 2' 26 ऑक्टोबरपासून प्रसारित होईल."
'साथ निभाना साथिया'चा पहिला सीझन 2010 मध्ये सुरू झाला आणि 2017 मध्ये तो संपला. मात्र ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. औरंगाबादचा तरुण संगीतकार यशराजने या मालिकेतील संवाद 'रसोडें में कौन था...' यावर एक रॅप साँग तयार केले आहे. जे खूप गाजत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या मालिकेची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
या शोमध्ये अभिनेत्री रूपल पटेल कोकिला मोदीच्या भूमिकेत झळकल्या होत्या. मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार, या मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये त्यांची जागा केतकी दवे घेऊ शकतात. केतकी दवे 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेसाठी ओळखल्या जातात.
View this post on InstagramA post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena) on Aug 31, 2020 at 8:35am PDT
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.