आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • The Narcotics Control Bureau Wants Custodial Interrogation Of Bharti Singh And Haarsh Limbachiyaa, Seeks Cancellation Of Their Bail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारती-हर्षचा जामीन रद्द करण्याची मागणी:NCB ने NDPS कोर्टाकडे मागितली भारती-हर्षची कस्टडी, न्यायालयीन कोठडीऐवजी एनसीबीच्या ताब्यात देण्याची केली मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना कोर्टाने 24 नोव्हेंबर रोजी 15-15 हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला होता.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी विशेष एनडीपीएस न्यायालयात केली आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणा-या एनसीबीने दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याऐवजी चौकशीसाठी एनसीबीच्या ताब्यात सोपवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने मंगळवारी या संदर्भात भारती आणि हर्षला नोटीस पाठवली असून, या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

23 नोव्हेंबरला मिळाला होता जामीन
भारती आणि हर्षच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा जप्त केल्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी भारतीला आणि 23 नोव्हेंबर रोजी हर्षला अटक करण्यात आली होती. एनडीपीएस न्यायालयाने दोघाना 4 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र दुस-या दिवशी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला होता.

ड्रग्ज प्रकरणात कसे समोर आले होते भारती आणि हर्षचे नाव?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. एनसीबीने खार दांडा परिसरात छापा घातला होता. कारवाईत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 15 एलएसडी डॉट्स, 40 ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अंमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारती आणि तिच्या नव-याचे नाव समोर आले होते.

21 नोव्हेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने भारतीच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनसीबीने एनडीपीएस कायदा 1986, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या दोघांनाही मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र नंतर दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. 23 नोव्हेंबर रोजी दोघांना जामीन मंजूर झाला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser