आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू एंट्री:अखेर सस्पेन्स संपला, 'भाबीजी घर पर है'मध्‍ये अनिता भाभीच्‍या भूमिकेत झळकणार अभिनेत्री नेहा पेंडसे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेत नेहा नवीन रूपामध्‍ये दिसेल.

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'भाबीजी घर पर है' या विनोदी मालिकेत अनिता भाभीची भूमिका कोण साकारणार, याबाबत खूप चर्चा रंगली होती. अखेर सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम लागला आहे. या मालिकेच निर्माते बिनाफर कोहली आणि संजय कोहली यांनी अनिता भाभीच्या भूमिकेसाठी मोहक व प्रतिभावान नेहा पेंडसेची निवड केली आहे. खूप प्रतिक्षेनंतर आपल्‍या विभुती नारायण मिश्राचे (आसिफ शेख) त्‍याच्‍या पत्‍नीसोबत पुनर्मिलन होणार आहे. मालिकेत नेहा नवीन रूपामध्‍ये दिसेल.

मालिकेमध्‍ये बोलताना नेहा पेंडसे म्‍हणाली, ''भारताची लाडकी अनिता भाभी कोण असेल, याबाबत महिन्‍यांपासून अनेक अपेक्षा व अंदाज वर्तवले जात होते. प्रेक्षक नवीन अनिता भाभीबाबत जाणून घेण्‍यासाठी तितकेच उत्‍सुक असण्‍यासोबत आतुरतेने वाट पाहत आले आहेत. मला मागील सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी 'भाबीजी घर पर है' या मालिकेचा भाग असण्‍याचा खूप आनंद झाला आहे. ही मोठी जबाबदारी आहे आणि निश्चितच मोठी उणीव भरून काढण्‍याची गरज आहे. पण, मला खात्री आहे की प्रेक्षक त्‍यांच्‍या नवीन अनिता भाभीवर तितकेच प्रेम व आपुलकीचा वर्षाव करतील. मी लवकरच शूटिंग सुरू करण्‍यास उत्‍सुक आहे.''

मालिकेमधील भूमिकेबाबत बोलताना नेहा म्‍हणाली, ''अनेक गोष्‍टी पाहायला मिळणार आहेत. मी याबाबत आता सविस्‍तरपणे सांगू शकत नाही. प्रेक्षकांसाठी ते सरप्राईज आहे. पण, मी एका गोष्‍टीची निश्चितच खात्री देऊ शकते की मोहकता, ग्‍लॅमर, हास्‍य व धमाल पाहायला मिळणार आहे. त्‍यासाठी तुम्‍हाला आगामी एपिसोड्सची वाट पाहावी लागेल. तुमचे प्रेम व आशीर्वाद कायम असू द्या.''

बातम्या आणखी आहेत...