आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग शो:'चीकू की मम्मी दूर की'च्या आगामी प्रोमोमध्ये डान्सिंग स्टारची लागणार वर्णी, निर्माते करताहेत मिथुन दा आणि गोविंदाच्या नावाचा विचार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'चीकू की मम्मी दूर की' हा शो लवकरच सुरु होणार आहे.

स्टार प्लसचा आगामी शो 'चीकू की मम्मी दूर की' आपल्या आकर्षक प्रोमोजसोबत आई मुलाच्या नात्याची सुंदर कहाणी सादर करून दर्शकांचे खूप मनोरंजन करत आहे. परिधि शर्मा आणि वैष्णवी प्रजापति यांच्या या शोमध्ये आई मुलाची सुंदर कहाणी दाखवण्यात आली आहे, जे एक-दूसऱ्यापासून वेगळे होतात आणि आपल्यामधल्या नृत्याच्या सामायिक धाग्याने जवळ येतात. चाहते आतुरतेने या शोची वाट पहात असतानाच स्टार प्लस आपल्या चाहतांसाठी एक मोठे सरप्राइज घेऊन सज्ज आहे.

वृत्तानुसार, 'चीकू की मम्मी दूर की' या शोच्या आगामी प्रोमोमध्ये बॉलिवूडचे डिस्को डांसर मिथुन दा किंवा सुपरस्टार गोविंदा यांना सहभागी करण्याचा विचार करत आहे. मिथुन दा आणि गोविंदा यांना बॉलिवूडचे डान्सिंग लेजेंड मानले जाते आणि या शोमध्ये नृत्य एक महत्वपूर्ण बाजू आहे, यासाठी निर्मात्यांच्या मनात या शोच्या नव्या प्रोमोसाठी या डान्सिंग सुपरस्टारपेक्षा वेगळा विचार नाहीये. मिथुन दा आणि गोविंदा यांना पडद्यावर आपल्या अनोख्या प्रतिभेसाठी ओळखले जाते. निर्माते अद्याप या दोघांच्या नावावर विचार करत आहेत. मात्र, या दोघांपैकी कोणालाही ऑन-स्क्रीन पाहणे निश्चितपणे एक रोमांचक ट्रीट असेल.

बातम्या आणखी आहेत...