आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्वेता तिवारी सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचा नवरा अभिनव कोहलीने मुलाला दूर केल्याचा आरोप करत तिला कायदेशीर नोटीस पाठवली होती. आता तिचा माजी कर्मचारी राजेश पांडे यांनी तिच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राजेशने श्वेतावर फसवणूकीचा आरोप केला होता.
श्वेता माझ्यावर खोटे आरोप करत आहे श्वेताच्या अॅक्टिंग इन्स्टिस्ट्युटमध्ये शिक्षक म्हणून काम करणा-या राजेश पांडेंनी श्वेता आपल्यावर खोटे आरोप करत असून आपली प्रतिमा मलीन करत असल्याचे म्हटले आहे. दिव्य मराठीसोबतच्या बातचीतमध्ये राजेश म्हणाले, ‘मी गेली पाच वर्षे श्वेता तिवारीच्या अभिनय शाळेत शिक्षक म्हणून कामा करत होतो. 2012पासून मी तिच्या अकादमीशी संबंधित होतो. या अकादमीत जवळपास 10-15 मुले नियमितपणे अभिनय शिकण्यासाठी यायची. मात्र, दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी विद्यार्थी नसल्यामुळे श्वेताला तिची अभिनय शाळा बंद करावी लागली होती. परंतु, तिने मला पूर्ण पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. या गोष्टीला आता दोन वर्षे झाली आहेत. ठरल्याप्रमाणे ना तिने मला पगार दिला आहे, ना आयकरच्या नावावर कापलेले पैसे परत केले.
ते पुढे सांगतात, 'तिच्यासाठी 52 हजार रुपये परत करणे मोठी गोष्ट नाही. मी अनेकदा तिच्याकडे पैसे मागितले. मात्र ती यासाठी तयार झाली नाही. जेव्हा मी मीडियासमोर माझे म्हणणे ठेवले तेव्हा तिने मला खोटे ठरवले. तिच्या मते मी हे सर्व प्रसिद्धीसाठी करतोय. ती माझ्यावर खोटे आरोप करत आहे, ज्यामुळे माझी प्रतीमा मलीन होत आहे.’
श्वेताविरोधात 2 कोटींचा मानहानीचा खटला
राजेश यांनी श्वेता तिवारीविरोधात 2 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. ते स्पष्ट करतात की, "गेली दोन वर्षे मी बर्याच मानसिक छळाला तोंड देत आहे. एकीकडे ती माझे पैसे मला परत करत नाही आणि दुसरीकडे ती माझ्यावर पब्लिसिटी स्टंटचा आरोप करत आहे. त्याचा माझ्यावर खूप वाईट परिणाम होतोय. मी जेव्हा जेव्हा जाब विचारण्यासाठी जातो तेव्हाती मला अर्धे पैसे परत करणार असल्याचे म्हणते. मी श्वेताविरोधात 2 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. आतापर्यंत तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसला तरी कायदेशीर कागदपत्रे तिच्यापर्यंत पोहोचली आहेत."
52 हजार रुपये परत न केल्याचे सुरु झाला वाद
एक महिन्याचा पूर्ण पगार 40,000 रुपये आणि प्राप्तीकराच्या नावाखाली कापलेले 10% प्रमाणे 12,000 रुपये इतकी रक्कम श्वेताने अडकवून ठेवली असल्याचे राजेश यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.