आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • These TV Shows Postponed Due To Lockdown In B Town Including Amitabh Bachchan KBC 12 And Shilpa Shetty Super Dancer 4

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना इफेक्ट:लॉकडाऊनमुळे पोस्टपोन झाले हे टीव्ही शो, अमिताभ बच्चनच्या 'KBC-12' आणि शिल्पा शेट्टीच्या 'सुपर डांसर 4'चाही समावेश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'केबीसी 12' आणि 'सुपर डान्सर 4' शिवाय आणखी काही शोजपुढे ढकलण्यात आले आहेत.

कोरोनाव्हायरसचा एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीवर गंभीर परिणाम झाला आहे. चित्रपटांसह अनेक इव्हेंट्स आणि फेस्टिव्हल्स रद्द करण्यात आले तर काही लांबणीवर टाकण्यात आले आहे. इंडियन टेलिव्हिजिन इंडस्ट्रीवरही त्याचा फार वाईट परिणाम झाला आहे. टीव्ही मालिकांचे शूटिंग थांबल्यामुळे वाहिन्यांनी जुन्या कार्यक्रमांचे पुन्हा प्रसारण सुरू केले आहे. अनेक वाहिन्या एप्रिल-मेच्या अखेरीस त्यांचे नवीन कार्यक्रम सुरू करणार होते, परंतू आता ते पुढे ढकलण्यात आले आहेत. तर दुसरीकडे काही मोठ्या शोज आहेत, ज्यांची तयारी सुरू होणार होती परंतु याक्षणी ते देखील थांबले आहे. अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 12'च्या तयारीपासून शिल्पा शेट्टीच्या 'सुपर डान्सर 4' पर्यंत असे अनेक शो आहेत ज्यांचे शूट कोरोनाव्हायरसमुळे पुढे ढकलले गेले आहेत.

चॅनेलशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, “गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वाहिनीने 'कौन बनेगा करोडपती' या शोचे 12 वे पर्व ऑगस्ट महिन्यात सुरु करण्याची योजना आखली होती. नियोजनानुसार या शोची नोंदणी एप्रिलच्या अखेरीस सुरू होणार होती. याची घोषणा स्वत: होस्ट अमिताभ बच्चन करणार होते. परंतू आता ही योजना पुढे ढकलण्यात आली आहे. 'सुपर डान्सर 4' या डान्स रिअ‍ॅलिटी शोचीही हीच अवस्था आहे. वाहिनीने वेगवेगळ्या शहरांमध्ये ऑडिशनची योजना आखली होती. ऑडिशनची प्रक्रिया जवळपास 5 ते 6 महिने चालते आणि त्यानंतर टॉप कंटेस्टंट्सची घोषणा केली जाते. सध्या वाहिनीने त्यांचे सर्व प्लान्स होल्डवर ठेवले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढला तर शोच्या लाइनअपमध्ये बरेच बदल घडू शकता. इतकेच नाही तर काही शो ड्रॉपही करावे लागू शकतात, ज्यामुळे वाहिनीला बरेच नुकसान सहन करावे लागेल." 'केबीसी 12' आणि 'सुपर डान्सर 4' शिवाय आणखी काही शोजपुढे ढकलण्यात आले आहेत.

अनुपमाः अनुपमा ही मालिका 16 मार्चपासून प्रसारित होणार होती, जी आता नंतर लाँच केली जाणार आहे. कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे कलाकार आणि क्रू मेंबर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन नेटवर्कने ऑन-एयर लाँचची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'ये रिश्ते हैं प्यार के' या मालिकेचे निर्माते राजन शाही या मालिकेचे निर्माते आहेत. 

या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली याविषयी म्हणते, “अनुपमा हा एक कार्यक्रम आहे जो प्रेक्षकांसमवेत भावनिक प्रवासावर लक्ष केंद्रित करेल. आपल्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शो सुरू होण्यास उशीर होणे शो आणि युनिटच्या हिताचे आहे. आमच्या सर्वांसाठी हा एक अतिशय खास प्रोजेक्ट आहे आणि तो पोस्टपोन करणे हा एक मोठा निर्णय आहे. जेव्हा मी अनुपमा प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून पाहते तेव्हा मला असे वाटते की प्रत्येक भाग सुंदर शूट झाला आहे आणि प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा ठरेल. या शोचा एक भाग बनल्याबद्दल आणि सर्वांकडून खूप प्रेम मिळाल्याबद्दल धन्यवाद." अनुपमामध्ये रुपाली गांगुलीसह सुधांशु पांडे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

इश्क में मरजावां 2: हेली शाह अभिनीत 'इश्क में मरजावां 2' 30 मार्च रोजी लाँच होणार होता. मात्र, नॅशनल लॉकडाऊनमुळे आता ही मालिकाही लांबणीवर पडली आहे. याविषयी हेली सांगते, "हो, सद्य परिस्थितीमुळे शोला उशीर  होतोय पण आपणास माहित आहे की प्रत्येकाच्या आरोग्यास धोका आहे आणि लॉकडाऊन खूप महत्वाचे आहे. थोडी निराशा आहे पण अशा वातावरणात हा निर्णय योग्य आहे. जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येते तेव्हा आम्ही शो सुरु करु."

क्यों रिश्तों में कट्टी बट्टी : सिद्धार्थ वीर सूर्यवंशी आणि नेहा मुद्रा स्टारर 'क्यों रिश्तों में कट्टी बट्टी' हा एक फॅमिली ड्रामा असून यात  मुलांच्या दृष्टीकोनातून वडीलधा-यांची कथा दाखवण्यात येणार आहे. चॅनेलच्या नियोजनानुसार हा शो 31 मार्चपर्यंत लाँच होणार होता. परंतु आता त्यास आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तेरा यार हूं मैं : राजेंद्र चावला स्टारर फिल्म 'तेरा यार हूं मैं' ही मालिका मे महिन्यात लाँच होणार होती, मात्र सद्यपरिस्थितीमुळे वाहिनी ही मालिका कधी प्रसारित करावी, याविषयी निर्णय घेऊ शकत नाहीये. 

इंडिया वाली मां : अक्षय म्हात्रे आणि सुचित्रा त्रिवेदी स्टारर 'इंडिया वाली मां' हा शो एप्रिलच्या अखेरीस लाँच होणार होता. शोची कथा संपूर्णपणे  सुचित्रा त्रिवेदीवर आधारित आहे जी या मालिकेत आईची भूमिका साकारत आहे. सध्या या मालिकेलाही होल्डवर ठेवण्यात आले आहे.  

बातम्या आणखी आहेत...