आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 15:जंगल थीमवर बनले आहे बिग बॉसचे आलिशान घर, शो सुरू होण्यापूर्वी बघा घराचे इनसाइड फोटो

किरण जैन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जंगल थीमवर बनलेल्या "बिग बॉस''च्या घराची झलक पाहा...

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस 15' आजपासून (2 ऑक्टोबर) सुरू होत आहे. नेहमी प्रमाणे याही वेळी देखील 'बिग बॉस'चे घर खूप मोठे आणि आलिशान आहे. या आलिशान घराची झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे घर आतून नेमके कसे दिसते, हे तुम्हाला येथे बघायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आर्ट डिझायनर आणि फिल्म मेकर ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता हे घर डिझाईन करत आहेत. यावेळीही या जोडीने हा सेट बनवला आहे.

बिग बॉसचे आर्ट डिझायनर ओमंग यांनी सांगितले घराबद्दल

दैनिक भास्करसोबतच्या बातचीतमध्ये ओमंग कुमार सांगतात, "या वेळी मला जंगल थीमवर घराची रचना करण्यास सांगण्यात आले आणि मी ते बनवले. हे घर बघून तुम्ही आधी थक्क व्हाल. हे जंगल आहे की बिग बॉसचे घर असा तुमचा गोंधळ उडेल. शोचा सेट तयार करणे नेहमीच आव्हानात्मक होते, यावेळी देखील ते एका आव्हानापेक्षा कमी नव्हते. प्रत्येक वेळी आम्ही घरात बाग करायचो, पण यावेळी मी त्याला जंगलाचे रूप दिले आहे. रात्रंदिवसाच्या परिश्रमानंतर हा सेट तयार झाला आहे."

विश्वसुंदरी नावाच्या झाडातून ऐकू येईल अभिनेत्री रेखाचा आवाज

ओमंग पुढे म्हणतात, "शो जंगलासारखा दिसावा म्हणून विश्वसुंदरी नावाचे एक झाड बनवले आहे. येथे स्पर्धकांना अभिनेत्री रेखाचा आवाज ऐकू येईल. तसेच आम्ही एक पूल बनवला आहे, जो सुंदर फुलांनी सजवला आहे. विश्वास ठेवा हा सेट रात्री खूप सुंदर दिसेल. असा सेट 'बिग बॉस' आणि 'बिग ब्रदर' सारख्या शोच्या इतिहासात कधीच पाहिला नाही. हे असे ठिकाण आहे जिथे स्पर्धक अनेक महिने एकत्र घालवतील. आम्ही ब-याच नवीन गोष्टी केल्या आहेत. घराची रचना अतिशय मनोरंजक पद्धतीने करण्यात आली आहे आणि मला आशा आहे की स्पर्धक आणि प्रेक्षकांना ते आवडेल. "

यावेळी बिग बॉसमध्ये दिसणार जंगल का दंगल

ओमंग सांगतात, "गार्डन एरियाचे रुपांतर जंगलात करण्यात आले आहे. हिरवीगार झाडे, गवत, लटकलेले झुले आणि गुप्त दरवाजे असलेले हे जंगल सुंदरता आणि रोमांचचा अनुभव देईल. तलावासारखा एका कुंडाला गुलाबी कमळाने सुशोभित केले आहे. जंगलाचे सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी, बोलणारे झाड- विश्वसुंदरी आहे, जे जंगलाच्या मध्यभागी आहे. जंगलाचा काही भाग लिव्हिंग रुम आणि किचन एरियात विभागला गेला आहे. जिथे स्पर्धक त्यांचा बहुतेक वेळ घालवताना दिसतील.

असा असेल घरातील नजारा
हे आलिशान जंगल पार केल्यानंतर स्पर्धक मुख्य घराच्या दिशेने जातील. हे घर अतिशय भव्यदिव्य आहे. लिव्हिंग रूमच्या मध्यभागी एक मोठा राजहंस ठेवला आहे. सोनेरी आणि पिवळ्या रंगाच्या थीमसह, बेडरुम क्षेत्र एक रहस्यमय क्षेत्र बनवले गेले आहे.

घरातील कन्फेशन रुम एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नसेल

जेव्हा तुम्ही कन्फेशन रुममध्ये प्रवेश करता तेव्हा तिथे बोललेला प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. या ठिकाणी अनेक रहस्ये आहेत. या पर्वात या रुममध्ये स्पर्धकांसाठी जांभळ्या आणि लाल रंगाचे आलिशान सोफे आणि खुर्च्या आहेत. जे कुशशने सुशोभित केलेले आहेत. त्यावर एक मोठे मुकूटही बघायला मिळते.

बातम्या आणखी आहेत...