आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Troller Advises Kapil Sharma Speaking On Farmer Movement To Do Comedy Quietly, Comedian Gives A Befitting Reply

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रोलर्सला सडेतोड उत्तर:शेतकरी आंदोलनावर मत व्यक्त करणा-या कपिल शर्माला ट्रोलरने दिला आपले काम करण्याचा सल्ला, कपिलने खास शैलीत उत्तर देऊन केली बोलती बंद

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका ट्रोलरने कपिलचा अपमान करत त्याला आपले काम करण्याचा सल्ला दिला.

नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत असून गेल्या 4 दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत आहेत. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीव कॉमेडी किंग कपिल शर्माने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले. शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून संतापलेल्या कपिल शर्माने या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन केले आहे. कपिलने मांडलेल मत ट्रोलरला रुचलेले दिसत नाही. एका ट्रोलरने कपिलचा अपमान करत त्याला आपले काम करण्याचा सल्ला दिला. यावर कपिलनेही सडेतोड उत्तर देत ट्रोलरची बोलती बंद केली आहे.

शेतक-यांना कपिलने दर्शवला पाठिंबा कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘कुठलेही प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात. त्यामुळे या प्रश्नावरही सामंजस्याने तोडगा काढता येईल. याल प्रश्नाला राजकीय वळण देऊ नका’, असे आवाहन कपिल शर्माने केले आहे. ‘आम्ही सगळे देशवासी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तेच आपले अन्नदाते आहेत’, असे म्हणत त्यांने या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

कपिलच्या या प्रतिक्रियेवर एका नेटक-याने लिहिले, 'तू फक्त कॉमेडी कर. राजकारण करण्याचा प्रयत्न करु नको. शेतक-यांचा मित्र होण्याचा प्रयत्न करु नको, जे तुझे काम आहे त्यावरच लक्ष केंद्रित कर.'

कपिलने ट्रोलरला दिले चोख उत्तर
ट्रोलरच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष न करता कपिलने त्याला उत्तर दिले आहे. कपिलने लिहिले, 'भावा मी माझे कामच करत आहे. कृपया तू देखील तेच कर. देशभक्त लिहिल्याने कुणी देशभक्त होत नाही. काम करा आणि देशाच्या प्रगतीत हातभार लाव. 50 रुपयांचे रिचार्ज करुन फालतू ज्ञान देऊ नको. धन्यवाद. जय जवान जय किसान.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser