आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TRP Trend : Kapil's Show Out Of From "Top 5", Ramayana Is Still In The Top 5; 15% More Likes For IPL This Year, Know The Trend Of TRP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीआरपी:कपिलचा शो “टॉप 5’ मधून बाहेर, रामायण अजूनही अव्वल 5 मध्ये; यंदा आयपीएलला 15% अधिक पसंती, जाणून घ्या टीआरपीचा कल

मनीषा भल्ला | मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीआरपीमध्ये क्रीडा वाहिन्या मनाेरंजनावर पडल्या भारी

वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवरून सध्या वादंग सुरू असतानाच मनोरंजन वाहिन्यांच्या टीआरपीमध्ये काही वेगळा कल दिसत आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडियाने (बीएआरसी) प्रसिद्ध केलेल्या अगोदरच्या दाेन टीआरपी तक्त्यांमध्ये स्टार स्पाेर्ट‌्स हिंदी वाहिनी अव्वल स्थानावर आहे. त्याआधी अनेक आठवडे स्टार उत्सव वाहिनी अव्वल स्थानावर हाेती. ही वाहिनी २०२० मधील ३९ आठवडे म्हणजे २६ सप्टेंबरपासून २ ऑक्टाेबरपर्यंत टीआरपीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हाेती. शाेंच्या बाबत सांगायचे तर कपिल शर्मा शाे अव्वल ५ मधून बाहेर फेकला गेला असून अमिताभ बच्चनचा ‘काैन बनेगा कराेेडपती’ शाे २८ सप्टेंबरपासून आतापर्यंत अव्वल पाचमध्ये जागा मिळवू शकला नाही. टीआरपीमध्ये सध्या झी टीव्हीवरील कुंडली भाग्य अव्वल स्थानावर आहे, तर दंगल वाहिनीवरील रामायण पाचव्या क्रमांकावर आहे. द कपिल शर्मा शाेची शहरी चव अव्वल पाचमधून गायब झाल्याने ताे हैराण असल्याचे बीएआरसीच्या एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

वृत्तवाहिन्यांवर सुशांतसिंहच्या आत्महत्येशी संबंधित कार्यक्रम व आयपीएल ही या कार्यक्रमांचे मानांकन कमी हाेण्याची सर्वात दाेन माेठी कारणे आहेत. सुशांतसिंह आत्महत्या आणि एनसीबीच्या कारवाईच्या बहाण्याने वृत्तवाहिन्यांनी या वेळी करमणुकीची कमान सांभाळली हाेती. कोविडमुळे आता पुरुष देखील घरात असल्याने प्राइमटाइमचे स्वरूप बदलले आहे. महिला घरी असतात तेव्हा त्याचा प्राइमटाइमवर वेगळा परिणाम होतो. परंतु पुरुषांबरोबरच तरुण मुलेही सध्या घरीच आहेत. कोणताही चित्रपट प्रदर्शित न झाल्याने द कपिल शर्मा शाेमध्ये सध्या कोणतीही माेठी नट मंडळी आलेली नाहीत. प्रेक्षकांशिवाय व कोणत्याही बड्या कलाकाराशिवाय चित्रीकरण करण्यास पूर्वीसारखी मजाही येत नाहीये, असे एका टीव्ही निर्मात्याने सांगितले. मागील १२ आठवड्यांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास टीव्हीच्या प्रेक्षक वर्गात एकूण २२% वाढ झाली आहे. साधारण मनोरंजन वाहिन्याही (जीईसी) हळूहळू काेविड अगोदरच्या स्थितीत येत असून त्यांचे (प्राइम टाइम) पाहण्याच्या मिनिटांत ४ टक्के वाढ झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser