आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऑफ कॅमेरा:‘तुझसे है राबता’मधील आयुष आणि सेहबान पडद्यामागे आहेत एकमेकांचे चांगले मित्र, या मैत्रीविषयी आयुष म्हणाला...

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेहबान आणि मी एकमेकांना भाऊच मानतो, असे आयुषने सांगितले.

छोट्या पडद्यावरील ‘तुझसे है राबता’ या लोकप्रिय मालिकेचे कथानक एका नव्या वळणावर येऊन ठेपले होते. त्यामुळे या मालिकेच्या नव्या भागांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून नवीन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता कल्याणी (रीम शेख), मल्हार (सेहबान अझीम) आणि त्रिलोक (आयुष आनंद) या व्यक्तीरेखांभोवती मालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर जवळजवळ 100 दिवसांनी हे तिन्ही कलाकार सेटवर पोहोचले तेव्हा त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

सेटवर एकत्र काम करताना मल्हारची भूमिका साकारणारा सेहबान आणि त्रिलोकची भूमिका साकारणारा आयुष हे एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत. आपला सहकलाकार सेहबानशी असलेल्या मैत्रीबद्दल आयुष फारच हळवेपणाने बोलतो. हे दोन्ही कलाकार आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करतात आणि एकमेकांशी चर्चा करून कोणताही प्रसंग अधिक कसा खुलवायचा, हे ठरवितात. अलीकडेच मालिकेतील एका संघर्षमय प्रसंगात दोघांनीही सगळ्यांची प्रशंसा मिळवली. प्रसंगाचे चित्रीकरण ओके झाल्यावर या दोघांनी एकमेकांच्या कामाची प्रशंसा केली.

याविषयी आयुष म्हणाला, “सेहबान आणि मी एकमेकांना भाऊच मानतो. मालिकेतील एका दृश्यात आमच्यात संघर्ष निर्माण होतो, असा हा प्रसंग होता आणि तो कसा साकारावयाचा यावर आम्ही एकमेकांशी चर्चा केली. आमची क्रिएटिव्ह टीम आणि दिग्दर्शकांनी हा प्रसंग रंगविण्यासाठी आम्हाला कलाकारांचं स्वातंत्र्य बहाल केलं होतं. अशा प्रसंगांमध्ये आम्ही दोघेही एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच मला सेहबानभाईबरोबर कोणताही प्रसंग साकारताना खूपच मजा आणि उत्साह येतो. हा प्रसंग साकार करण्याच्या आमच्या अभिव्यक्तीवर आम्ही दोघेही समाधानी होतो आणि कॅमेरा थांबल्यावर आम्ही एकमेकांचे हात हवेत उंचावून टाळी दिली. अभिनयाच्या माझ्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव मिळाला की मला अतीव समाधान लाभतं. ही भावना माझ्यासाठी विशेष महत्त्वाची ठरते”, असे आयुषने सांगितले.