आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीची याचना:आयसीयूमध्ये दाखल असलेल्या अभिनेत्याला मिळत नाहीये मदत, म्हणाला -'मला आता सलमान खानकडून मदतीची अपेक्षा'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत त्यांच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलेला नाही.

'ससुराल सिमर का' फेम अभिनेता आशिष रॉय मुंबईच्या इस्पितळात आयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आयसीयूमध्ये दाखल असल्याची बातमी स्वतः आशिष यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आणि चाहत्यांकडे आर्थिक मदतीची विनंती केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये इंडस्ट्रीतील अन्य कलाकारांकडेही आर्थिक मदत मागितली आहे, पण आतापर्यंत त्यांनी कुणीही मदतीसाठी पुढे आलेला नाही.

सलमानकडे करणार मदतीची याचना : आशिषच्या दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणे थांबवले आहे आणि ते डायलिसिसवर आहेत. त्यांच्या शरीरात बरेच पाणी झाले होते.

आशिष यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले,  "माझे डायलिसिस चालू आहे पण तब्येतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. मला माहित नाही की मी येथे किती काळ उपचार घेऊ शकेन कारण रुग्णालयाचे बिल प्रत्येक वाढत्या दिवसाबरोबर वाढतच आहे. दोन दिवसांचे बिल जवळपास दोन लाख रुपये झाले आहे. ते पैसे मी भरले परंतु आता अधिक काळ मी रुग्णालयात उपचार घेऊ शकणार नाही. कारण माझ्याकडे आता एक पैसाही उरलेला नाही. मी पुरता कंगाल झालो आहे. आता मला केवळ सलमान खानकडूनच मदतीची अपेक्षा आहे. मला खात्री आहे की माझी अवस्था पाहून तो मला नक्की मदत करेल.”

ते पुढे म्हणाले की, सलमानबरोबर काम केल्यामुळे मी माझा मित्र सूरज थापरच्या माध्यमातून त्याच्याशी किंवा त्याचे फाउंडेशन बीइंग ह्यूमन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे.

आशिषकडे काम नाही

2019 च्या सुरुवातीच्या महिन्यात आशिष यांना अर्धांगवायू झाला. आशिष म्हणाले, "मी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर बरा झालो, पण मला काम मिळाले नाही. मी सध्या माझ्या बचतीवर आयुष्य जगतोय पण तेही संपुष्टात येणार आहे. मला कोलकातामध्ये माझ्या बहिणीकडे शिफ्ट केले जाईल, पण इंडस्ट्रीमधील एखाद्याने मला काम द्यावे, अन्यथा काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे.' आशिष एक व्हॉईस-ओवर आर्टिस्ट असून त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केलं आहे.

बातम्या आणखी आहेत...