आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण-निशा यांच्यातील वाद चव्हाट्यावर:करण मेहराने विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप फेटाळला, म्हणाला - मी कधीही निशाची फसवणुक केली नाही

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण मेहरा म्हणतो - माझे कुणाशीही विवाहबाह्य संबंध नाहीत

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. निशा रावलने करणविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमवारी करणला अटक केली होती. अटकेनंतर काही तासातंच त्याची जामिनावर सुटका झाली. निशाने करणवर त्याचे विवाहबाह्य संबध असल्याचा आरोप लावला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून दोघांच्या नात्यात तणाव असल्याचे तिने म्हटले. निशाच्या या आरोपानंतर आता करणची प्रतिक्रिया समोर आली असून त्याने निशाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. निशाची कधीच फसवणुक केली नाही, असे करणने म्हटले आहे.

माझे कुणाशीही विवाहबाह्य संबंध नाहीत
एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करणने निशाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. करण म्हणाला, "मला ठाऊक होते की, असे सर्व आरोप माझ्यावर लावले जातील आणि माझे नाव अनेकांशी जोडले जाईल. पण या सर्व कथा निराधार आहेत. मी निशाची कधीही फसवणूक केली नाही आणि माझे विवाहबाह्य संबंधही नाहीत," असे करणने स्पष्ट केले आहे.

करणने यापूर्वीही मांडली होती स्वतःची बाजू
दरम्यान त्याआधी करणने त्याची बाजू मांडताना निशा बायपोलर आणि आक्रमक आहे तसेच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता. तो म्हणाला होता, 'निशाच्या म्हणण्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी बोलण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिने माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिने मला दिली होती. त्यानंतर तिने स्वतःचे डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचे सर्वांना सांगितले.'

निशा म्हणाली - माझ्याकडे पुरावे आहेत

यापूर्वी एका मुलाखतीत निशाने म्हटले होते की, करणवर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे पुरावे आहेत. पती करण मेहराच्या फोनवर काही मसेज सापडल्यानंतर त्याच्या अफेअर बद्दल लक्षात आल्याचे ती म्हणाली आहे. मात्र कुटुंब आणि मित्र परिवारापासून तिने सर्व गोष्टी लपवल्या. लग्न टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे निशाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...