आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही अभिनेता करण वाहीची आई वीणा वाही यांनी चार महिन्यांत 18 किलो वजन कमी केले आहे. 62 वर्षीय वीणा यांना ताहिरा कोचरने वजन कमी करण्यास मदत केली. वयाच्या या टप्प्यावर आईचे ट्रान्सफॉर्मेशन बघून करणला खूप आनंद झाला. म्हणून त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या आईचा व्हिडिओ आणि फोटो शेअर करुन प्रशिक्षकाचे आभार मानले.
करणने पोस्टमध्ये लिहिले- 'आई मला तुझा अभिमान आहे. माझे म्हणणे ऐकल्याबद्दल आणि इतरांपेक्षा स्वतःची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. माझी आई 62 वर्षांची आणि हायपोथायरॉईड रुग्ण आहे. पण मला आनंद आहे की, मी तिला प्रेरणा देण्यात यशस्वी झालो आहे. चार महिन्यांत तिने 18 किलो वजन कमी केले. लॉकडाऊन असूनही माझी आई स्ट्राँग राहिली. ताहिरा कोचर, हे काम करुन दाखवल्याबद्दल तुमचे आभार. वय ही फक्त एक संख्या आहे. लोकांचे प्रेरणास्थान व्हा, त्यांच्याद्वारे प्रभावित होऊ नका. लव्ह यू मॉम.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.