आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वरागिनी, इस प्यार को क्या नाम नाम दूं, दिया और बाती हम, अगले जनम मोह बिटिया ही किजो आणि घर की लक्ष्मी बेटियां यासारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री नुपूर अलंकार सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. नुपूरला मदत करण्यासाठी तिची मैत्रीण आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी फेसबुकवर लोकांना आवाहन केले आहे.
आजारी आईच्या उपचारांसाठी पैसे नाहीत: रेणुका यांनी फेसबुकवर लिहिले, ‘नुपूरचे सर्व पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याचा फटका तिलाही बसला आहे. तिच्या कमाईतून आतापर्यंत ती आईचा उपचार करत होती. मात्र लॉकडाउनमुळे ते सुद्धा बंद झाले आहे. तिच्या आईच्या उपचारासाठी कृपया जमेल तितकी आर्थिक मदत करा’, असे रेणुका यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
यासोबतच त्यांनी नुपूरच्या आईच्या बँक अकाऊंटची माहिती देताना लिहिले की, 'तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. मी तिच्या आईच्या बँक खात्याचे तपशील शेअर करत आहे. कृपया शक्य तितकी मदत करा. माझ्यावर विश्वास ठेवा, आवश्यकतेशिवाय नुपूर मदत मागणार नाही, परंतु परिस्थिती अशी बनली आहे. धन्यवाद.'
या पोस्टवर नुपूरने रेणुका यांचे आभार मानले आणि त्यांचे एंजल म्हणून वर्णन केले आहे.
पीएमसी बँक घोटाळ्यात अडकलेले पैसे
नूपुरला पीएमसी बँक घोटाळ्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यामुळे तिच्यावर दागिने विकण्याचीही वेळ आली होती. नुपूरचे सगळे अकाऊंट याच बँकेत आहेत, त्यामुळे ती आर्थिक अडचणीत सापडली आहे. एका मुलाखतीत नुपूरने सांगितले होते, "मी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. माझे दुस-या बँकांमध्येही खाते होते. त्यातील रक्कम मी काही वर्षांपूर्वी पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत ट्रान्सफर केली होती. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची संपूर्ण जमापुंजी याच बँकेत असल्याने आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत."
मित्रांकडून घेतले होते 50 हजारांचे कर्ज
नुपूरने मुलाखतीत सांगितले होते, 'आमच्याकडे आता घरात पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे माझ्याकडे घर चालवण्यासाठी दागिने विकण्याची वेळ आली आहे. इतकेच नाही तर माझ्यावर माझ्या को-अॅक्टरकडून तीन हजार रुपये उसणे घेण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मी ओळखीतील लोकांकडून 50 हजारांचे कर्ज घेतले.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.