आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नागिन'च्या अभिनेत्याला अटक:अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी TV अभिनेता पर्ल पुरीला अटक, अभिनेत्यासह सहा जणांवर बलात्काराचा आरोप

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 जूनला रात्री पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे .

‘नागिन 3’ या गाजलेल्या मालिकेत झळकलेला 31 वर्षीय अभिनेता पर्ल वी पुरीला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पर्लला (POSCO) ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सहा जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. एका अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पीडित तरुणीच्या आरोपांनुसार सर्व आरोपींनी आधी एका कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अनेकदा तिचा विनयभंग करण्यात आला.

मीरा भाईंदर वसई विरार (एमबीव्हीव्ही) चे डीसीपी संजय पाटील यांनी सांगितले की, बलात्कार आणि पोस्को अंतर्गत विविध कलमांखाली सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाईल.

सीरियलमध्ये काम मिळून देण्याच्या नावाखाली शोषण केले
पीडितेने केलेल्या आरोपानुसार आरोपी अभिनेत्याने टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. नऊ वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेला पर्ल पुरी गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलीला ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

करिश्मा तन्नासोबत रिलेशनशिपमध्ये होता पर्ल
अभिनेता पर्ल पुरी त्याच्या रिलेशलशिपमुळे कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिश्मा तन्नासोबत तो रिलेशशिपमध्ये असून दोघांच्या अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांमध्ये काही मतभेद निर्माण झाल्याने ते विभक्त झाले होते.

या टीव्ही शोजमध्ये झळकला होता पर्ल पुरी
पर्लने नागिन 3 सोबतच 'दिल की नजर से खूबसूरत', 'फिर भी ना माने बदतमीज दिल', 'मेरी सासू मां', 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार' आणि 'ब्रह्मराक्षस 2' या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तो बिग बॉस 12 आणि 13 मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय किचन चॅम्पिअन 5 आणि खतरा-खतरा-खतरा या रिअॅलिटी शोजमध्येही पर्लने काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...