आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Actor Pearl Puri Granted Bail; Ekta Kapoor, Karisma Tanna Anita Hasanandani Supports Pearl Puri On Rape Allegation

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण:पर्ल पुरीची न्यायालयीन कोठडीत रवानगी; एकता कपूर, अनिता हसनंदानीसह करिश्मा तन्नाने दिला पाठिंबा, एकता म्हणाली - पीडितेच्या आईने पर्ल निर्दोष असल्याचे मला सांगितले

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

'नागिन 3' या मालिकेत झळकलेला टीव्ही अभिनेता पर्ल पुरीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार, पर्लची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापूर्वी त्याची कथित एक्स-गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री करिश्मा तन्नाने पोस्ट शेअर करत पर्लला जामीन मंजुर झाल्याचे सांगितले होते. मात्र आता आलेल्या वृत्तानुसार, पर्लला जामीन मिळालेला नसून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

पर्ल पुरी याला पोलिसांनी आयपीसी कलम सीआर आयपीसी 376 एबी, आर / डब्ल्यू पीओसीएसओ कायदा 4, 8, 12, 19, 21 अंतर्गत अटक केली होती.

दुसरीकडे पर्लवर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार म्हणत आहे. टीव्ही निर्माती एकता कपूर, अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि करिश्मा तन्नासह अनेक सेलेब्स या प्रकरणात पर्लच्या बाजुने उभे आहेत. त्यांनी पर्लला आपला पाठिंबा दिला आहे.

एकता कपूर म्हणाली - बलात्कार पीडितेच्या आईने मला सांगितले पर्ल पुरी निर्दोष आहे
टीव्ही निर्माती एकता कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून तिने पर्ल पुरीला पाठिंबा दिला आहे. एकताने पर्लसोबतचा एक फोटो शेअर करत सांगितले की, पीडितेच्या आईने तिला पर्ल निर्दोष असल्याचे सांगितले आहे. एकता म्हणाली, 'मी एका लहान मुलीसोबत दुष्कर्म करणा-या व्यक्तीला पाठिंबा देईल का? काल रात्रीपासून आतापर्यंत मी जे पाहिले, ती ते तिरस्कारणीय आहे. माणुसकी इतक्या खालच्या पातळीवर कशी येऊ शकते?'

एकता पुढे म्हणते, 'एकमेकांवर नाराज असलेले लोक तिसर्‍या व्यक्तीला त्यांच्या लढाईत कसे खेचू शकतात? एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीशी असे कसे वागू शकते? पीडित मुलीच्या आईशी फोनवर बर्‍याच वेळा माझे बोलणे झाले आहे. यात पर्लचा काहीही दोष नसून तो निर्दोष आहे, असे तिने मला सांगितले. हा तिच्या नव-याचा कट आहे. सेटवर काम करताना आई आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही हे सिद्ध करण्याचा तिचा नवरा प्रयत्न करीत आहे, असे पीडितेच्या आईने मला सांगितले.' सोबतच मुलीच्या आईचे व्हॉइस नोट्स आपल्याकडे असल्याचेही एकता म्हणाली आहे.

करिश्मा तन्ना म्हणाली - सत्यमेव जयते
एकेकाळी पर्लसोबत रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री करिश्ना तन्ना हिने सोशल मीडियावर पर्लला जामीन मंजुर झाल्याची माहिती शेअर केली. 'सत्यमेव जयते. सत्य नेहमीच जिंकतो आणि पर्ल जिंकला आहे,’ अशा आशयाची पोस्ट करिश्माने शेअर केली आहे. सोबतच तिने #IStandWithPearlPuri, #TruthNeverHides, #PVP सारख्या हॅशटॅगचा वापर केला आहे.

अनिता हसनंदानी म्हणाली - पर्लवरील आरोप बिनबुडाचे
अभिनेत्री अनिताने पर्लसोबत नागिन 3 मध्ये काम केले आहे. अनिताने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले आहे, 'शनिवारी सकाळी उठल्यावर पर्लची बातमी समजली. माझ्या मते ही बातमी खोटी आणि बिनबुडाची आहे. मी पर्लला चांगली ओळखते. त्यामुळे हे खरे असूच शकत नाही. त्यावर झालेले आरोप खोटे आहेत. हे काही तरी वेगळेच प्रकरण असणार आहे, याची मला खात्री आहे. लवकरच सत्य काय आहे ते बाहेर येईल,' असे ती म्हणाली आहे. या पोस्टसह अनिताने #ISTANDWITHPEARL हा हॅशटॅग दिला आहे.

काय आहे प्रकरण?
वृत्तानुसार, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी पर्लला पोलिसांनी अटक केली होती. अहवालानुसार या मुलीचे वय 5 ते 7 वर्षाच्या दरम्यान आहे आणि म्हणून पर्लवर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 2019-20 चे आहे, जिथे पर्ल मुंबईला लागून वसई नायगाव दरम्यान त्याच्या सीरियलसाठी शूट करत होता. ज्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पर्लवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्याची पत्नीदेखील या मालिकेचा एक भाग होती. ही तक्रार केवळ मुलीच्या वडिलांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे.

या टीव्ही शोजमध्ये झळकला होता पर्ल पुरी

पर्लने नागिन 3 सोबतच 'दिल की नजर से खूबसूरत', 'फिर भी ना माने बदतमीज दिल', 'मेरी सासू मां', 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार' आणि 'ब्रह्मराक्षस 2' या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तो बिग बॉस 12 आणि 13 मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय किचन चॅम्पिअन 5 आणि खतरा-खतरा-खतरा या रिअॅलिटी शोजमध्येही पर्लने काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...