आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण:पर्ल व्ही. पुरीला मोठा दिलासा, 11 दिवस पोलिस कोठडीत घालवल्यानंतर जामीन मंजुर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षे जुने आहे प्रकरण

'नागिन 3' या मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेता पर्ल वी पुरी याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून 4 जून रोजी अटक करण्यात आली होती. 11 दिवस पोलिस कोठडीत घालवल्यानंतर पर्लला मंगळवारी जामीन मिळाला आहे. पर्लला जामीन मिळाल्याची बातमी त्याचे वकील राजीव सावंत यांनी दिली आहे. वसई सेशन कोर्टाने मंगळवारी पर्लला जामीनावर सोडले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपावरून पर्लविरोधात वसई- विरार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी पर्लने दोनदा (5 जून आणि 11 जून रोजी) जामीनासाठी प्रयत्न केला होता. मात्र दोन्ही वेळा त्याची याचिका फेटाळण्यात आली होती.

दोन वर्षे जुने प्रकरण
हे प्रकरण 2019 मधील आहे. पीडत मुलगी तिच्या आईसोबत मालिकेच्या सेटवर येत असे. पीडितेच्या आईने पर्लसोबत एका मालिकेत एकत्र काम केले होते. त्यावेळी सेटवर आलेल्या या मुलीवर 31 वर्षीय पर्ल व्ही पुरीने व्हेनिटी व्हॅनमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीच्या वडिलांच्या एफआयआरनंतर पर्लला अटक करण्यात आली आहे. तर पीडितेच्या आईने मात्र पर्लला निर्दोष सांगितले आहे. सध्या तो 14 दिवस न्यायालयीन कोठडीत आहे.

पीडितेच्या वडिलांनी खुलासा करत पर्लची ओळख स्वतः त्यांच्या मुलीनेच सांगितल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी एक निवेदन जाहीर केले. ज्यात त्यांनी लिहिले की, 'माझी मुलगी गेले पाच महिने तिच्या आईसोबत होती. माझ्या मुलीसोबत माझा कोणताही संपर्क नव्हता. जेव्हा मी तिच्या शाळेत फी भरण्यासाठी गेलो तेव्हा ती येऊन मला बिलगली. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने माझ्यासोबत घरी येण्याचा हट्ट केला. मी तिला घरी घेऊन आल्यानंतर तिने घडलेली संपूर्ण घटना मला सांगितली. त्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली. मुलीची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली त्यात हे स्पष्ट झाले होते की मुलगी खरे बोलत आहे. तिचं शोषण करण्यात आले आहे.'

या टीव्ही शोजमध्ये झळकला पर्ल पुरी

पर्लने 'नागिन 3' सोबतच 'दिल की नजर से खूबसूरत', 'फिर भी ना माने बदतमीज दिल', 'मेरी सासू मां', 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार' आणि 'ब्रह्मराक्षस 2' या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तो बिग बॉस 12 आणि 13 मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय किचन चॅम्पिअन 5 आणि खतरा-खतरा-खतरा या रिअॅलिटी शोजमध्येही पर्लने काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...