आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'नागिन 3' अभिनेता पर्ल व्ही पुरीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे वडील विपीन पुरी हे आजारी होते. गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. बातमी कळताच पर्ल शूटिंग अर्ध्यावर सोडून त्याच्या मुळगावी म्हणजे आग्र्याला रवाना झाला आहे.
पर्ल व्ही पुरी हा सध्या त्याच्या आगामी 'ब्रह्मराक्षस 2' या मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने मुंबईत होता. अचानक वडिलांच्या निधनाची बातमी समजताच तो आपल्या गावी रवाना झाला. पर्लच्या अनुपस्थितीत सध्या काही दिवस मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. पिंकविल्लाच्या सूत्रानुसार, पर्लचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना न्यूमोनिया झाल्याचेही सांगण्यात येत होते.
महिनाभरापूर्वीच आजीला गमावले
गेल्याच महिन्यात पर्लच्या आजी (आईची आई) ते निधन झाले होते. 25 सप्टेंबर रोजी आजीचे निधन झाल्यानंतर पर्लने एक भावनिक नोट लिहिली होती. त्याने लिहिले होते की, 'तुमच्यासारखे कोणी नव्हते, आणि कधीही नसणार आजी. मी नेहमी तुम्हाला म्हणायचो की तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी. आज मी म्हणतोय की, तुम्ही आम्हा सर्वांची काळजी घ्या. तुमची उणीव कायम भासेल. जगातील सर्वात चांगली आजी,' असा शब्दांत पर्लने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
View this post on InstagramA post shared by Pearl V Puri (@pearlvpuri) on Sep 25, 2020 at 2:41am PDT
लॉकडाउनपासून कुटुंबासमवेत होता पर्ल
लॉकडाउनपासून ते शूटिंग सुरु होईपर्यंतचा संपूर्ण काळ पर्लने आग्र्यामध्ये आपल्या कुटूंबासमवेत घालवला. ऑगस्टमध्ये त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या छोटेखानी सेलिब्रेशनचे फोटोदेखील पर्लने शेअर केले होते. कुटुंबासमवेत एक लांब सुटी घालवल्यानंतर तो आपल्या आगामी शोच्या चित्रीकरणासाठी मुंबईला परतला होता.
View this post on InstagramA post shared by Pearl V Puri (@pearlvpuri) on Aug 8, 2020 at 7:42am PDT
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.