आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता तुरुंगात:'कसौटी जिंदगी की फेम' अभिनेता प्राचीन चौहानला अटक, तरुणीचा विनयभंग केल्याचा आहे आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कलमांतर्गत गुन्हा दाखल

टीव्ही जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता प्राचीन चौहानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्राचीनवर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप असून मालाड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून प्राचीन लोकप्रिय झाला होता. या मालिकेतूनच त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल
प्राचीन चौहानला तरुणीशी गैरवर्तन आणि छेड काढल्याच्या आरोपाखाली मलाड पूर्व पोलिसांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राचीनच्या विरोधात भांदवी कलम 354, 342, 323 आणि 502 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

या मालिकांमध्ये झळकला आहे प्राचीन
'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केल्यानंतर प्राचीनने अनेक मालिकांमध्ये अभिनय केला. 'कुछ झुकी पलकें', 'सिंदूर तेरे नाम का', 'सात फेरे' आणि 'माता पिता के चरणों में स्वर्ग' या मालिकांमध्ये तो झळकला. याशिवाय तो प्राचीन युट्यूबवरील 'शिटी आइडियाज ट्रेंडिंग' या शोमुळे चर्चेत आहे. यात त्याने अभिमन्यूची भूमिका साकारली आहे.

काही दिवसांपूर्वीच झाली होती पर्ल व्ही पुरीला अटक
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता पर्ल व्ही पुरी यालादेखील अल्पवयीनवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. अटकेनंतर काही दिवसांनी पर्लची जामिनावर मुक्तताही झाली. या प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोच प्राचीन चौहानच्या प्रकरणामुळे टीव्ही विश्वाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अद्याप या प्रकरणावर प्राचीन किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील त्याच्या कोणत्याही मित्राची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...