आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अभिनेत्याचा मृत्यू:एकाकीपणाच्या गर्तेत सापडलेल्या समीर शर्माने आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर दिला होता मृत्यूचा इशारा, लिहिले होते - मी माझी चिता तयार केली आहे आणि त्यावर झोपलोय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समीर काही काळापासून नैराश्यात होता.

एकाकीपणाच्या खोल गर्तेत सापडलेल्या आणखी एका कलाकाराने आपले आयुष्य संपवले आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह घराच्या किचनमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केल्याचे समजते.

समीर काही काळापासून नैराश्यात होता, हे त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिसून येतंय. इतकेच नाही तर 27 जुलै रोजी त्याने एक पोस्ट टाकली होती. त्यावरुन तो नैराश्येत असल्याचे समजते. या पोस्टमध्ये त्याने मृत्यूकडे इशारा केला होता. या पोस्टच्या पहिल्या ओळीत लिहिले होते की - मी माझी चिता तयार केली आहे आणि त्यावर झोपलोय. माझ्या आगीने ती जळतेय.

  • पत्नीपासून वेगळा राहात होता

समीर शर्मा मूळचा दिल्लीचा होता. शिक्षण संपल्यानंतर तो बंगळुरुला गेला आणि तेथील एका अॅड एजन्सीमध्ये काम केले. यानंतर, तो अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आला. समीरचे लग्न अचला शर्माशी झाले होते आणि काही काळापासून दोघे वेगळे राहात असल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...