आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Actors Are Celebrating Rakshabandhan; Someone Celebrated The Festival Four Days Ago, While Someone Misses His Sister Very Much

रक्षाबंधन स्पेशल 2020:टीव्ही कलाकार असा साजरा करत आहेत रक्षाबंधनाचा सण; कुणी चार दिवसांपूर्वीच साजरा केला सण तर कुणी बहिणीला करतंय खूप मिस

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'टीव्ही सेलिब्रिटी लॉकडाऊनमध्ये हा सण कसा साजरा करत आहेत, हे जाणून घेऊयात...

लॉकडाऊनमुळे अनेकांनी रक्षाबंधन साजरे करण्याच्या नियोजनात बदल केले आहेत. त्यामुळे दिव्य मराठीने काही नामांकित टेलिव्हिजन सेलिब्रिटींशी संवाद साधत ते लॉकडाऊनमध्ये हा सण कसा साजरा करत आहेत, हे जाणून घेतले...

अभिनेत्री मुग्धा चाफेकर
अभिनेत्री मुग्धा चाफेकर

‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’मध्ये प्राचीची भूमिका रंगविणारी मुग्धा चापेकर म्हणाली, “सध्याच्या या आगळ्यावेगळ्या परिस्थितीमुळे मी यंदा रक्षाबंधनासाठी काही खास योजना बनविलेली नाही. चित्रीकरणातून एका दिवसाची सुटी मिळाली, तर मी राखीसाठी घरी जाईन; नाहीतर आम्ही रक्षाबंधन व्हर्च्यअल साजरं करू! पण मी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यास कधीच चुकत नाही. तो माझ्यासाठी खास सण आहे. अनेकांना ठाऊक नसेल, पण मला एक भाऊ आहे. आदित्य हा माझा धाकटा भाऊ आहे. लहान असताना माझे पालक माझ्यासाठी भेट घेऊन येत, त्या तो मला देत असे. पण जेव्हा त्याला नोकरी लागली, तेव्हा त्याने त्याचा पहिला पगार मला भेट म्हणून दिला. ते पाहून मी अवाक झाले आणि मला त्याचा खूप अभिमान वाटला. तो मला नेहमीच अभिमानास्पद वाटतो. तो आणि माझा चुलत भाऊ ओंकार हे त्यांच्या प्रत्येक कर्तबगारीनंतर मला अभिमानास्पद वाटतात. असे भाऊ मला लाभले, हे माझं भाग्यच म्हटलं पाहिजे. ते मला माझा आधारस्तंभ वाटतात. सर्व भावा-बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

अभिनेता करण जोटवाणी
अभिनेता करण जोटवाणी

‘कुरबान हुआ’मध्ये नीलची भूमिका साकारणारा करण जोटवाणी म्हणतो, “मला सख्खी बहीण नसली, तरी मला चुलत बहिणी आहेत. त्यांच्याशी माझं अगदी जवळचं नातं असून त्यामुळेच रक्षाबंधनाचा दिवस माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरला आहे. लहानपणी आम्ही या दिवशी खूपच धमाल करीत असलो, तरी यंदा हा खूपच भावपूर्ण सण बनला आहे. कारण यंदा माझी ही बहीण आपल्या नव्या कारकीर्दीची सुरुवात करण्यासाठी तीन वर्षांसाठी चेन्नईला रवाना होणार असल्याने आम्ही रक्षाबंधन चार दिवस आधीच साजरं करण्याचा निर्णय घेतला होता. आम्हाला तिला निरोप देणं बरंच जड गेलं, तरी तिच्या आयुष्यासाठी हा खरोखरच एक उत्तम निर्णय होता. अर्थात भौगोलिक दुरावा आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवणार नाही.”

अभिनेत्री रुही चतुर्वेदी
अभिनेत्री रुही चतुर्वेदी

‘कुंडली भाग्य’मध्ये शर्लिनची भूमिका रंगविणारी रूही चतुर्वेदी म्हणाली, “यंदाचा रक्षाबंधनाचा सण नेहमीपेक्षा वेगळा असेल, कारण यंदा मी बाहेरगावी चित्रीकरण करीत असल्याने मला घरी जाता येणार नाही. मला माझ्या वडिलांचं आरोग्य धोक्यात टाकायचं नाहीये. माझ्या सोसायटीत बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नसल्याने मी माझ्या भावाला आमच्या इमारतीबाहेर भेटेन. त्यामुळे यंदा मी रक्षाबंधन आमच्या सोसायटीच्या बाहेर साजरं करू, तरीही तो एक खास सोहळा असेल. रक्षाबंधन हा माझ्यासाठी नेहमीच एक खास सण ठरलेला आहे. एकदा मी उदयपूरमध्ये चित्रीकरण करीत होते, तेव्हा कोणतीही पूर्वसूचना न देता माझा भाऊ मला भेटायला आला. त्याच्या या अनपेक्षित भेटीमुळे तो दिवस खूपच खास बनला. मी त्याला इतकंच सांगू इच्छिते की मी तुझ्याशी कितीही भांडले, तरी माझ्या आयुष्यात तूच सर्वात खास व्यक्ती असशील. सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

अभिनेता मनीत जौरा
अभिनेता मनीत जौरा

‘कुंडली भाग्य’मध्ये ऋषभची भूमिका रंगविणारा मनीत जौरा म्हणाला, “यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी मला दिल्लीला माझ्या बहिणीकडे जाता येणार नाही कारण मी बाहेरगावी चित्रीकरण करीत आहे. त्यामुळे मला कोणाचंही जीवन धोक्यात घालायचं नाहीये. तसंच दिल्ली किंवा मुंबईत क्वारंटाईन करून घेण्याइतके दिवसही माझ्याकडे नाहीत. त्यामुळे यंदाच्या या अभूतपूर्व परिस्थितीमुळे मी आणि माझ्या बहिणीसाठी हे व्हर्च्युअल रक्षाबंधन असेल. असं असलं, तरी मला ठाऊक आहे की माझी बहीण काहीतरी खास कार्यक्रम आखतच असेल. मला काय आवडतं, ते तिला चांगलंच ठाऊक आहे आणि मला अनपेक्षितपणे सुखद धक्का देण्यासाठी ती काहीतरी करीत असेलच. मीसुध्दा तिला एक खास भेट देऊन चकित करणार आहे. 2007 मध्ये, मला आठवतंय, तिच्या लग्नानंतरचा पहिल्या रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी ती दिल्लीत होती आणि मी मुंबईत आलो होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी मला तिच्याकडे येता येणार नाही, असं तिला वाटत होतं आणि मीसुध्दा बराच बिझी होतो. पण रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी मला तिची राखी पोस्टातून मिळाली, तेव्हा मी तिला भेटण्याचा निर्णय घेतला. मी ताबडतोब माझी बॅग भरली आणि विमानाने दिल्लीला गेलो. मला प्रत्यक्ष पाहून तिला रडूच कोसळलं. यंदा मात्र मला दिल्लीला विमानानेही जाता येणार नाहीये. तरीही यंदाचा राखीचा सण मी तिच्यासाठी खास बनविणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मी तिच्यासोबत आहे, हे मला तिला दाखवून द्यायचं आहे.”

अभिनेत्री आएशा सिंह
अभिनेत्री आएशा सिंह

‘इश्क सुभान अल्ला’मध्ये झाराची भूमिका रंगविणारी आएशा सिंह म्हणाली, “मुळात यंदा मी माझा भावाबरोबर भोपाळमध्ये राखी साजरी करण्याचा विचार केला होता. पण मी आता पुन्हा एकदा इश्क सुभान अल्लामध्ये काम करू लागल्यामुळे मला मुंबईला यावं लागलं. त्यामुळे यंदा आम्हाला व्हर्च्युअल रक्षाबंधन साजरं करावं लागणार असून व्हिडिओ कॉलवरून मी माझ्या भावांना आणि माझ्या बाबांना राखी बांधेन. माझे वडील मला नेहमी आशावादी आणि आनंदी ठेवतात. माझा मूड ते सुधारतात. सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळात आम्ही भावंडांनी चित्रं काढण्यात बराच काळ व्यतीत केला. तो माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असला, तरी तो वयाच्या मानाने खूपच समंजस आहे. त्याला टीव्ही मालिकांचं काम कसं चालतं, ते ठाऊक आहे. तो मला कायम पाठिंबा देतो आणि मला कामात प्रोत्साहनही देतो. ज्या दिवशी मी जास्तच दमलेली असते, तेव्हा तो माझे पाय चेपतो आणि चांगला मसाजही करतो. आम्ही जितके एकमेकांशी भांडतो, तितकेच आम्ही एकमेकांवर प्रेमही करतो. तो माझ्या आयुष्यातील एक खास व्यक्ती आहे.”

अभिनेता संजय गगनाणी
अभिनेता संजय गगनाणी

‘कुंडली भाग्य’मध्ये पृथ्वीची भूमिका साकारणारा संजय गगनाणी म्हणाला, “आमच्या घरात रक्षाबंधनाचा दिवस हा दर वर्षी एक खास दिवस असतो. त्या दिवशी आम्ही लवकर उठतो, घरात रक्षाबंधनाशी संबंधित गाणी सुरू असतात आणि मग आंघोळी आटोपून आम्ही राखी बांधण्याचा कार्यक्रम करतो. मला सख्खी बहीण नाहीये, पण माझ्या आतेबहिणी आणि मावशा मला तिची उणीव भासू देत नाहीत. त्यांना त्यांच्या जीवनात येणा-या सर्व अडचणींपासून मी त्यांना वाचविण्याची शपथ घेतो. दरवर्षी आम्ही त्याच प्रेमाने हा सण साजरा करतो. यंदा कदाचित आम्हाला वेगळ्या प्रकारे हा सण साजरा करावा लागेल, असं दिसतंय, पण आम्ही त्याचाही आनंद लुटू, याची मला खात्री आहे. रक्षाबंधनाच्या आधीच काही दिवस मी माझ्या बहिणींना हे सांगू इच्छितो की केवळ त्या दिवशीच नव्हे, तर मी त्यांच्यामागे कायमच उभा असेन. त्यांना सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि त्यांच्या जीवनातील सर्व चढ-उतारांमध्ये मी त्यांच्यासोबत असेन. यंदाही मी दरवर्षीप्रमाणेच रक्षाबंधनाच्या दिवशी चित्रीकरणातून सुटी घेतली आहे. त्या दिवशी मी माझ्या कुटुंबियांसह रक्षाबंधनाचा आनंद घेईन.”

बातम्या आणखी आहेत...