आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Actors Puja Banerjee Kunal Verma Wedding Celebrations Cancelled; Couple Donated Money To Corona Affected People

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:15 एप्रिल रोजी होणार होते पूजा-कुणालचे लग्न, लॉकडाऊनमुळे लग्नाचे सर्व फंक्शन्स रद्द करुन गरजूंना दान केली रक्कम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्च महिन्यात कुणाल आणि पूजाचे रजिस्टर मॅरेज झाले आहे.

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांचे 15 एप्रिल रोजी लग्न होते. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांनी लग्नाचे सर्व फंक्शन्स रद्द केले आहेत. इतकेच नाही तर या जोडप्याने त्यांच्या लग्नात खर्च होणारी संपूर्ण रक्कम गरजूंना दान केली आहे. पूजाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये याचा खुलासा केला आहे.

  • गेल्या महिन्यात झाले रजिस्टर मॅरेज

पूजाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले की, मार्चमध्येच कुणालसोबत तिचे रजिस्टर मॅरेज झाले आहे. पूजाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे- “आम्ही आज लग्न करणार होतो, पण परिस्थिती अशी आहे की आम्हाला सर्व विधी रद्द कराव्या लागल्या. तथापि गेल्या महिन्यातच आमचे रजिस्टर लग्न झाले आहे. त्यामुळे अधिकृतपणे आम्ही पती-पत्नी आहोत. आईवडील आणि आजी-आजोबांच्या आशीर्वादाने आम्ही आमचे नवीन आयुष्य सुरू करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादांची गरज आहे. लोक या कठीण परिस्थितीत आपल्या जीवनासाठी संघर्ष करीत आहेत हे ऐकून मन दु: खी झाले आहे. आमच्या प्रार्थना प्रत्येकासोबत आहेत. आमच्या वतीने, गरजूंना एक लहानशी मदत म्हणून आम्ही आमच्या लग्नात जितकी रक्कम खर्च करणार होतो ती देणगी म्हणून देत ​​आहोत. हा उत्सव साजरा करण्याची वेळ नाही. परंतु आमच्या फॅन्ससोबत अशावेळी आम्ही आनंद साजरा करू जेव्हा संपूर्ण जग पुन्हा आनंदी होईल.'' 

बातम्या आणखी आहेत...