आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी:टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामीला कोरोनाची लागण, फोटो शेअर करत म्हणाली  - मी तिसऱ्या लाटेशी लढत आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दृष्टीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. टीव्ही आणि बॉलिवूडचे कलाकार पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी ही देखील कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दृष्टीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. फोटोमध्ये टेबलवर फुलांचा गुच्छ, ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी एक ऑक्सिमीटर, एक टॅबलेट, विक्सची एक डबी, चॉकलेट आणि काही कागदपत्रे ठेवली आहेत.

फोटो शेअर करताना दृष्टीने कॅप्शनमध्ये लिहिले, "तिसर्‍या लाटेशी लढताना माझ्यासोबत काही चांगल्या गोष्टी आहेत. सुदैवाने, मी या लिलींचा वास घेऊ शकते आणि ट्विक्स (चॉकलेट) चा आनंद घेऊ शकत आहे."

दृष्टीपूर्वी टीव्ही अभिनेता नकुल मेहता, त्याची पत्नी आणि 11 महिन्यांचा मुलगी सुफी यांना कोरोनाची लागण झाली. याशिवाय निर्माती एकता कपूर, डेलनाज इराणी, अर्जुन बिजलानी हे सेलिब्रिटीदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले. तर बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा, अर्जुन कपूर, नोरा फतेही, रिया कपूर, अंशुला कपूर, शिल्पा शिरोडकरला यांनाही कोरोनाची लागण झाली.

बातम्या आणखी आहेत...