आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला:टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रावर निर्मात्याने चाकूने चार वेळा केले वार, आरोपीसोबत फेसबुकवर झाली होती मैत्री

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशने मालवी हिच्यावर चाकूने चार वेळा वार केले.
  • मालवीच्या तक्रारीवरून पोलिसांनी योगेशविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मालवीवरील हा हल्ला योगेश नावाच्या व्यक्तीने केला आहे, जो स्वतःला निर्माता असल्याचे सांगतो. वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वेळा वार केले. हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवीची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.

  • फेसबुकच्या माध्यमातून आरोपीसोबत झाली होती मैत्री

मालवीच्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंहसोबत फेसबुकच्या माध्यमातून तिची मैत्री झाली होती. कामाच्या संदर्भात कॉफी कॅफे डेमध्ये ती एकदाच त्याला भेटली होती. सोमवारी रात्री ती घराबाहेर पडली तेव्हा योगेश त्याच्या ऑडी कारच्या बाहेर उभा होता. त्याने मालवीला रस्त्यावर रोखले आणि जेव्हा तिने त्याचा निषेध केला तेव्हा त्याने चाकूने तिच्यावर चार वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

  • खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांचा तपास सुरू

मालवी मल्होत्राच्या फिर्यादीवरून पोलिसांनी योगेशविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. घटनास्थळावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यातूनही पोलिसांना महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. मालवी मुळची हिमाचलची असून तिने काही हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...