आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • TV Actress Shrenu Parikh, Who Was Undergoing Treatment For Covid 19, Discharged From Hospital, Expressed Gratitude To Medical Staff And Corona Warriors

सेलेब्समध्ये कोरोना:कोविड-19 वर उपचार घेत असलेली टीव्ही अभिनेत्री श्रेनु पारिखला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, घरी आयसोलेट होऊन मेडिकल स्टाफ आणि कोरोना वॉरियर्सचे मानले आभार 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी इश्कबाजची अभिनेत्री श्रेनु पारिखचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याची माहिती अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. आता तिच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर तिला आयसोलेशनसाठी घरी पाठवण्यात आले आहे. घरी येताच अभिनेत्रीने सर्व कोरोना वॉरियर्स, मेडिकल स्टाफ आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.

श्रेनुला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला

गेल्या चार दिवसांपासून वडोदरा येथील रूग्णालयात उपचार घेत असलेली अभिनेत्री आता आपल्या घरी आयसोलेशनमध्ये राहणार आहे. याबद्दल माहिती देताना, श्रेनुने लिहिले की, माझे प्रिय कुटुंब, मित्र आणि माझे हितचिंतक. मला खूप प्रेम दिल्याबद्दल तुमचे आभार कसे मानावे. ईश्वराच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रार्थनांमुळे मी लवकर रिकव्हर होत आहे आणि मला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मी सध्या माझ्या घरी आयसोलेशनमध्ये आहे.

पुढे अभिनेत्रीने वॉरियर्सचे आभार मानत लिहिले की, 'मला निरोगी ठेवण्यासाठी आणि माझी देखरेख ठेवणारे मेडिकल स्टाफ आणि रुग्णालयातील कोरोना वॉरियर्सची मी नेहमी आभारी आहे.'

कोरोनाला म्हणाली अदृष्य राक्षस
श्रेनुने कोविड-19 पॉजिटिव्ह असल्याची माहिती देताना सांगितले होते की, काळजी घेऊनही ती कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. यावर तिने लिहिले होते की, 'एवढी सावधगिरी बाळगूनही जर कोरोना आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तर समजून घ्या की, या अदृष्य राक्षसाची शक्ती किती असेल. कृपया सावधान राहा आणइ स्वतःला वाचवा'