आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह:श्वेता तिवारीचे दुसरे लग्न मोडले नाही, पती अभिनव कोहली म्हणाला - 'आम्ही विभक्त झाले नसून सोबत आहोत' 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्वेताने 2013 मध्ये अभिनेता अभिनव कोहलीशी दुसरे लग्न केले होते.
Advertisement
Advertisement

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या गेल्या वर्षी आल्या आहेत. श्वेताने तिच्या नव-यावर मुलगी पलक तिवारीबद्दल अपशब्द वापरल्याचा आणि घरगुती हिंसाचार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

याशिवाय अभिनवसोबतच्या तणावपूर्ण नात्यावर श्वेताने मीडिया मुलाखतींमधून ब-याच गोष्टी उलगडल्या होत्या. पण आता दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे. अभिनवने एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत याविषयीचे संकेत दिले. अभिनवने टेलिचक्कर या वेबसाइटल्या दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, श्वेता आणि तो विभक्त झालेले नसून एकत्र राहात आहेत.

अभिनवने शेअर केला होता श्वेताचा व्हिडीओ : अभिनवने अलीकडेच श्वेताचा एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. यात श्वेता फहवान खान नावाच्या एका फॅनसोबत दिसतये. यासोबत अभिनवने श्वेता आणि फहवानचा एक सेल्फीदेखील शेअर केला होता. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अभिनवला खडे बोल सुनावले होते. 

श्वेतापासून विभक्त झाल्यानंतर अभिनव तिला आनंदी बघू शकत नाही, त्याला तिचा हेवा वाटतो, अशा कडक शब्दांत नेटक-यांनी अभिनवला सुनावले होते. पण या मुलाखतीत त्याने या व्हिडीओबद्दल सांगितले. अभिनव म्हणाला, मी तुम्हाला आता फक्त एवढेच सांगू इच्छितो की, धीर धरा. भविष्यात अजूनही काही व्हिडीओ आणि पोस्ट समोर येणार आहेत, ज्यावरुन जे तुम्हाला परिस्थिती स्पष्ट करतील. 

अभिनव पुढे म्हणाला, 'ही खूप गमतीशीर बाब आहे, की इंस्टाग्रामवर असे लोक माझ्या पोस्टवर कमेंट करत आहेत, ज्यांचे शून्य फॉलोअर्स आहेत. यावरुन हे लोक फक्त  द्वेष पसरविण्यासाठी अकाऊंट तयार करत असल्याचे स्पष्ट होते. पण यामुळे मला काही फरक पडत नाही, असेही अभिनव म्हणाला. 

व्हिडीओविषयी बोलताना तो पुढे म्हणाला की, आता मी तुम्हाला अजून जास्त काही सांगू शकत नाही, जेव्हा इतर पोस्ट येतील तेव्हा तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती मिळेल. फहवान आणि श्वेता यांची ही अचानक झालेली भेट नव्हती, तर ही माझ्या घरी झालेली सुनियोजित भेट होती, असेही अभिनवने सांगितले.

View this post on Instagram

Fahwaan Khan @shweta.tiwari

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024) on Jun 9, 2020 at 3:47am PDT

श्वेताचा पहिला घटस्फोट झाला आहे : श्वेताने 1999 साली वयाच्या 19 व्या वर्षी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि चित्रपट निर्माता राजा चौधरीसोबत लव्ह मॅरेज केले होते. दोघेही 2000 मध्ये मुलगी पलकचे आईवडील झाले. लग्नाच्या 9 वर्षानंतर श्वेताने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. घटस्फोटाची प्रक्रिया बर्‍याच दिवसांपर्यंत चालू राहिली आणि अखेर साडेपाच वर्षांनंतर म्हणजे 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

श्वेताचा दुसरा पती आहे अभिनव: श्वेताने 2013 मध्ये अभिनेता अभिनव कोहलीशी दुसरे लग्न केले. अभिनव आणि श्वेताला मुलगा रेयांश असून तो तीन वर्षांचा आहे. श्वेताने नागिन, सजन रे झूठ मत बोलो, परवरिश, बालवीर आणि बेगूसराय अशा मालिकांमध्येही काम केले आहे. श्वेता बिग बॉस सीझन -4 ची विजेती राहिली आहे.

Advertisement
0