आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कामावर परतायचे आहे!:गाइडलाइननुसार चित्रीकरणास टीव्ही कलावंत तयार, कलाकार म्हणाले - 'निर्माते गाइडलाइन्सचे पालन करतील अशी अपेक्षा' 

किरण जैन. मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन निर्मात्यांची चित्रीकरणासाठी चर्चा सुरू

महाराष्ट्र सरकारकडे सिने मजूर फेडरेशन आणि निर्मात्यांची असोसिएशन खूप दिवसांपासून चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागत आहेत. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने चित्रपट आणि टीव्ही मालिकांंच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. चित्रपट निर्माते आणि टीव्ही निर्मात्यांना 16 पानांची गाइडलाइन दिलेली आहे. त्यानुसारच चित्रीकरण होईल. याबाबत कलावंत आणि निर्माते काय म्हणतात, जाणून घेऊया...

  • ‘परिस्थिती कशी हाताळायची यावर चर्चा’ - जेडी मजीठिया, निर्माते

टीव्ही इंडस्ट्री दोन दिवसांत सुरू हाेईल अशी माहिती आहे. परंतु, हे शक्यच नाही कारण ही एक लांब प्रक्रिया असल्यामुळे ती पूर्ण होण्यास बराच वेळ लागेल. ब्रॉडकास्टर्स सर्वप्रथम आपल्या टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतील. एक फॉर्म भरून परवानगी घ्यावी लागते. असेही होऊ शकते की, जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती लागेल नंतर यावर विचार होईल. ही संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी माझ्या मते दोन आठवडे तरी लागतील. परवानगी मिळण्यास एक आठवडा लागू शकतो. हा फक्त एक अंदाज आहे. क्वाॅरंटाइन सामान्यत: 14 दिवसांचे असते. तेही कमी करण्याचे सुरू आहे. अशा परिस्थितीत कसे करायचे, यावर आम्ही सर्व निर्माते चर्चा करत आहोत

जेडी मजीठिया, निर्माते

'निर्माते गाइडलाइन्सचे पालन करतील अशी अपेक्षा' -भारती सिंह (कॉमेडियन-द कपिल शर्मा शो) ‘खरं सांगयचे तर बाहेरचे वातावरण पाहून मनात भीती आहे. हे तर स्पष्ट आहे की, आम्ही सर्वप्रकारची खबरदारी घेऊ, परंतु हे इतके सोपेही नाही. आमचे स्पॉटबॉय, हेअरस्टाइलिस्ट, मेकअप आर्टिस्ट या सर्वांचा पगार आमच्या कामाशी संबंधित आहे. निर्माता सरकारच्या गाइडलाइनचे योग्य पालन करतील अशी आशा आहे, कारण कलावंत आणि संपूर्ण युनिट त्यांच्यावर अवलंबून आहे.

भारती सिंह - कॉमेडियन
  • स्वतःला निरोगी बनवावे - अंबिका रंजनकर, अभिनेत्री (तारक मेहता का उल्टा चष्मा - मालिका)

आज नाही तर उद्या चित्रीकरण तर करावेच लागेल. म्हणून घाबरून राहण्याला काहीच अर्थ नाही. आता आम्हाला घराच्या बाहेर पडावेच लागेल. आम्हा कलावंतांना घरातून काम करण्याची मुभा नाही. मैदानात उतरावेच लागेल. स्वत:ला निरोगी बनवावे लागेल, जेणेकरून कोराेनाचा सामना करता येईल.

अंबिका रंजनकर, अभिनेत्री
  • ‘कलावंत, युनिटची कोविड तपासणी करणार निर्माते’ - सौम्या टंडन, अभिनेत्री (भाभीजी घर पर है - मालिका)

आपल्या महाराष्ट्र सरकारने 16 पानांची गाइडलाइन दिली आहे. यात खूप खबरदारी घ्यायचे सांगितले आहे. मात्र, यात मला दोन महत्त्वाचे मुद्दे दिसत नाहीत. सर्वप्रथम निर्माते या सर्व गाइडलाइन्सचे पालन करत आहेत की नाही, हे काेण पाहणार? दुसरी गोष्ट 33 टक्के टीमसोबत चित्रीकरण करण्याची परवानगी आहे, परंतु हे युनिट जे सेटवर राहूनच चित्रीकरण करणार आहे, ते काय कोविडमुक्त अाहेत? या गोष्टींची शहानिशा करणे खूप गरजेचे आहे. आम्ही ज्या कलाकारांसोबत काम करत आहोेत ते पॉझिटिव्ह आहेत किंवा नाहीत हे कसे कळणार? माझी निर्मात्यांना एकच विनंती आहे की, जर तुम्ही कलावंतांंना आणि दुसऱ्या युनिटला चित्रीकरणासाठी बोलवत आहात तर सर्वप्रथम त्यांची कोविड तपासणी करावी.

सौम्या टंडन, अभिनेत्री
  • 'निष्काळजीपणा केल्यास कारवाई झाली पाहिजे’ - निर्भय वाधवा, अभिनेता (कहत हनुमान जय श्री राम-मालिका)

तीन महिन्यांपासून मी काम केले नाही. घरभाडेदेखील दिले नाही. जर कामच करणार नाही तर पैसे कसे कमावणार. पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडावेच लागेल. मात्र मनात भीतीही आहे. मी खबरदारी घेईल, पण आजूबाजूचे लोक घेत नाहीत. माझ्या मते जे लोक निष्काळजीपणा करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे.

निर्भय वाधवा, अभिनेता
  • ‘या वातावरणाची भीती’ - रिया शर्मा, अभिनेत्री (ये रिश्ते हैं प्यार के- मालिका)

सध्याचे जे वातावरण आहे ती परिस्थिती आमच्यासाठी चांगली नाही. सर्वांप्रमाणे मलादेखील सरकारच्या गाइडलाइनवर पूर्ण विश्वास आहे. या गाइडलाइनचे आम्ही योग्य प्रकारे पालन केले तर आम्ही सुरक्षित राहू. खरं सांगू, या वातावरणत स्वत:चे रक्षण कसे करावे याबाबत मनात भीती आहे. तसे पाहिले तर भीती वाटायलाच पाहिजे जेणेकरून आम्ही जास्त खबरदारी घेऊ.

अभिनेत्री रिया शर्मा
0