आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री आत्महत्या प्रकरण:टीव्ही सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक, करण कुंद्राने ट्विटरवर लिहिले - 'ती खूप लहान होती, तिच्यासमोर पुर्ण आयुष्य होतं'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक सेलिब्रिटींनी प्रेक्षा मेहताच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

'क्राइम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' सारख्या शोमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने सोमवारी इंदूरस्थित तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.  प्रेक्षाने अवघ्या 25 व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली. तिच्या आत्महत्येमुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

अभिनेता करण कुंद्राने ट्विटरवर लिहिले की, ''सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्न मरुन जाणं’  आणि अशा प्रकारे आणखी एका टेलिव्हिजन अ‍ॅक्टरने आत्महत्या केली आणि हा तिचा इंस्टाग्रामवरचा शेवटचा संदेश होता. प्रेक्षा मेहता ही अत्यंत दुःखद घटना आहे. तू खूप तरुण होती. संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर पडले होते. आपण मानसिक आरोग्यावर अधिक बोलले पाहिजे.''

करणने पुढे लिहिलं आहे की, ''प्रेक्षाचे इंस्टाग्राम अकाउंटवर बघा, काहीही सोपं वाटत नाही,  या कठीण काळात आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेण्याची किती गरज आहे हे यावरुन सिद्ध होतं. आपण ते ठीक आहेत असे समजू नये. देव प्रेक्षाच्या आत्म्यास शांती देवो. ही वेळही निघून जाईल.''

अर्जुन बिजलानीने लिहिले की, 'आणखी एका टीव्ही कलाकाराच्या आत्महत्येची बातमी ऐकली. देव तिच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.' सुरभी चांदनाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे, 'अत्यंत दु:खद'.

अर्जुन बिजलानी आणि सुरभी चांदना यांचे ट्वीट
अर्जुन बिजलानी आणि सुरभी चांदना यांचे ट्वीट

अभिनेत्री दिव्या अग्रवालने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'जीवन सोपे नाही, त्यातल्या संकटांशी लढा द्या पण आत्महत्या हा पर्याय नाही'.

दिव्या अग्रवालची इंस्टाग्राम स्टोरी
दिव्या अग्रवालची इंस्टाग्राम स्टोरी
बातम्या आणखी आहेत...