आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही सेलिब्रिटींचे रक्षाबंधन:पहिल्यांदाच व्हिडिओ कॉलवर होईल रक्षाबंधन, कुरिअरने पाठवली राखी आणि गिफ्ट

किरण जैन, मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये टीव्ही कलाकार असे साजरे करणार रक्षाबंधन...

यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेकांनी रक्षाबंधन साजरे करण्याच्या नियोजनात बदल केले आहेत. त्यामुळे ‘दिव्य मराठीने’ काही नामांकित टेलिव्हिजन सेलिब्रिटींशी संवाद साधत ते लॉकडाऊनमध्ये हा सण कसा साजरा करत आहेत, हे जाणून घेतले...

  • दोन सख्ख्या मिळून 26 बहिणी आहेत - अभिनेता राहुल शर्मा

दरवर्षी कितीही व्यग्र असलो तरी प्रत्येक सणाला घरी जात असतो. मात्र, पहिल्यांदाच मी रक्षाबंधनला घरी गेलो नाही. माझ्या बहिणी राजस्थानात आहेत आणि मी मुंबईत आहे. मात्र आम्ही यंदा व्हिडिओ कॉलवर हा सण साजरा करू. माझ्या बहिणी राख्या पाठवतील. मला दोन सख्ख्या बहिणी आहेत आणि दुसऱ्या सर्व मिळून 26 बहिणी आहेत. दरवर्षी त्या सर्व घरी येतात. मी जेव्हा घरी जात नाही तेव्हा त्या मुंबईला येतात.

  • आईला सांगितले खीर बनव, मग माझी आठवण येणार नाही - अभिनेत्री कामना पाठक

लॉकडाऊन म्हणजे आमच्यासाठी परीक्षाच आहे. यावर्षी मला व्हर्चुअल पद्धतीनेच हा सण साजरा करावा लागणार आहे. कारण मी शूटिंगसाठी मुंबईला परतले आहे आणि भाऊ घरी इंदूरमध्ये आहे. त्यामुळे मी आईला फोन करून सांगितले, आमची मनपसंत खीर नक्की बनव, त्यामुळे माझी आठवण येणार नाही. दरवर्षी मी माझ्या हाताने खीर बनवायचे आणि खाऊ घालायचे.

  • छोटी बहीण बांधणार राखी - अभिनेत्री प्रणिता पंडित

यावर्षी रक्षाबंधन मी माझ्या भावासोबत साजरे करणार होते. कारण मी गरोदर आहे. मात्र माझी ही इच्छा पूर्ण होणार नाही. त्यामुळे मी फक्त व्हिडिओ कॉल करून त्याच्याशी बोलणार आहे.माझी लहान बहीण, जी दिल्लीत राहते, ती माझ्यावतीने त्याला राखी बांधणार आहे. मी या सणाला भावाला भेटणार नाही.

  • आम्ही तिघी बहिणी वडिलांना, तसेच एकमेकींना राखी बांधतो - अभिनेत्री शुभांगी अत्रे

मला दोन मोठ्या बहिणी आहेत, भाऊ नाही. दरवर्षी आम्ही तिघी वडिलांना राखी बांधतो. आमच्या बहिणींमधील सुंदर नाते व्यक्त करण्यासाठी आम्ही एकमेकींच्या हातावर राखी बांधतो. यावर्षी मी माझ्या गावी बहिणी आणि वडिलांसाठी राख्या पाठवल्या आहेत. व्हिडिओ कॉल आमच्यासाठी इतका महत्त्वाचा ठरेल, जो आमच्या सर्व कुटुंबांना एकमेकांशी जोडून ठेवेल, याचा मी विचारही केला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...