आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही इंडस्ट्रीवर लॉकडाउनचा परिणाम:अवघ्या 15 दिवसांत झाले 6.5 कोटींचे नुकसान; महाराष्ट्राबाहेर शूटिंग करणार्‍या निर्मात्यांनाही सेटमुळे सहन करावा लागतोय तोटा

किरण जैन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रीकरण ठप्प पडल्याने टीव्ही इंडस्ट्रीला अवघ्या 15 दिवसांत सुमारे 6.5 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारकडून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 22 एप्रिलपासून ते 1 मे पर्यंत राज्यात कडक लॉकडाउन आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल, मेट्रो, मोनो प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे सर्व प्रकारच्या शूटिंगला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील बरीच प्रसिद्ध शूटिंग लोकेशन्स (फिल्मसिटी, भजनलाल स्टुडिओ, रामदेव स्टुडिओ) बंद आहेत. कधी या ठिकाणी रात्रंदिवस चित्रीकरण केले जात असे, मात्र आता एखाद दुस-या व्यक्तीशिवाय येथे कुणीही दिसत नाही. चित्रीकरण ठप्प पडल्याने टीव्ही इंडस्ट्रीला अवघ्या 15 दिवसांत सुमारे 6.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

शूटिंगसाठी निर्मात्यांनी धरली मुंबईबाहेरची वाट
दिव्य मराठीशी बोलताना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कार्यकारी निर्माता शुभ उपाध्याय म्हणाले, "महाराष्ट्र सरकारच्या नवीन गाइडलाइनमुळे एंटरटेन्मेंट इंडस्ट्री विशेषतः टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. इंडस्ट्रीतील दररोज सुमारे एक लाख कामगार डेली वेजेसवर काम करतात. स्पॉटमन, लाइटमपासून ते सेटिंग करणा-या लाइटमनपर्यंत यापैकी आता कुणाकडेही काहीच काम नाही. कारण बहुतेक मालिकांचे चित्रीकरण मुंबईबाहेर शिफ्ट करण्यात आले आहे. काहींनी गोवा तर काहींनी हैदराबाद आणि उत्तर प्रदेशमध्ये चित्रीकरण हलवले आहे."

जितका मोठा शो, तितके अधिक नुकसान : शुभ
शुभ पुढे सांगतात, "मुंबईतील मोठमोठ्या शूटिंग लोकेशन्सवर मागील वर्षीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंडस्ट्रीतील अनेक कामगार आपल्या घरी परतत आहेत. निर्मातेही इथल्या लोकांना इतर ठिकाणी चित्रीकरणासाठी नेत नाहीत. ते स्थानिक कामगारांकडून काम करुन घेत आहेत. एका मोठ्या डेली शोचा प्रतिदिवसाचा खर्च अंदाजे 3.5 ते 4 लाख इतका असतो. छोट्या छोट्या कार्यक्रमांचा निर्मिती खर्चदेखील दररोज सुमारे एक लाख रुपये असतो. जेवढा मोठा शो तितके अधिक नुकसान. माझ्या मते, अवघ्या 15 दिवसांत इंडस्ट्रीला सुमारे साडे सहा कोटींचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली पाहिजे."

निर्मात्यांना सेटमुळे होतोय तोटा
ज्या निर्मात्यांनी त्यांच्या शोसाठी सेट्स तयार केले आहेत त्यांना लॉकडाउनमध्ये बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. एकीकडे, ते त्यांचे शो सुरु ठेवण्यासाठी इतर शहरांमधील लोकेशनवर पैसे खर्च करीत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील पूर्वीच्या सेटचे भाडेदेखील त्यांना द्यावे लागत आहे. मुंबईतील शूटिंगच्या लोकेशन्सचे प्रती दिवस प्रमाणे भाडे द्यावे लागते. हा आकडा प्रती दिवस सुमारे 25000 ते 1 लाख रुपयांपर्यंत असतो.

काही शो ज्याचे चित्रीकरण मुंबईबाहेर होत आहे

शोकुठे सुरु आहे चित्रीकरण
कुमकुम भाग्यगोवा
इमलीहैदराबाद
आपकी नजरों ने समझागोवा
साथ निभाना साथिया 2गुजरात
गुम है किसी के प्यार मेंदिल्ली
हमारी वाली गुड न्यूजहरियाणा
क्यों रिश्तों में कट्टी बट्टीसूरत
इंडियन आयडॉल 12दमन

बातम्या आणखी आहेत...