आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील 'भाबीजी घर पर है'ने सहा वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. मॉडर्न कॉलनीचे शेजारी-शेजारी राहणारे जोडपे मिश्रा व तिवारी दीर्घकाळापासून त्यांची विनोदीशैली व अभिनयासह प्रेक्षकांना हास्यानंद देण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत. धमाल कथानक व मनोरंजनपूर्ण पात्रांसह मालिका अत्यंत लोकप्रिय बनली असून लाखो प्रेक्षकांच्या मनावर प्रभुत्व गाजवत आहे. कलाकारांनी केक कापत हा खास क्षण साजरा केला.
कलाकारांनी मालिकेमधील त्यांच्या आवडत्या क्षणांबाबत, तसेच सलग सहा वर्षे मालिकेला प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय करणा-या बाबींबाबत सांगितले. नेहा पेंडसे (अनिता भाभी) म्हणाली, ''मी मालिका 'भाबीजी घर पर है'ची निस्सीम चाहती होती आणि एक प्रेक्षक म्हणून मी नित्यनेमाने मालिका पाहायची. ही मालिका माझ्यासाठी तणाव दूर करणारी होती आणि आता मी या मालिकेचा भाग असल्यामुळे धमाल व मस्ती दुप्पट झाले आहे. तसेच माझ्या मते ही पाहिलीच पाहिजे अशी मालिका आहे, कारण प्रत्येक पात्र अद्वितीय व नाविन्यपूर्ण आहे. या मालिकेने एक ओळख निर्माण केली आहे आणि प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. मिश्राजींची विलक्षणता, तिवारीजींची विनोदीशैली ते अंगूरी भाभीची निरागसता व अनिता भाभीच्या स्मार्टनेसपर्यंत प्रत्येक व्यक्तिमत्त्व अत्यंत खास आहे.''
आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा) म्हणाले, ''आम्ही खूप लांबचा पल्ला गाठला आहे आणि मालिकेला सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी आमच्या प्रेक्षकांचे आभार मानतो, जे नेहमीच आमच्याप्रती दयाळू व प्रेमळ राहिले आहेत. हा प्रवास त्यांच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण झाला नसता. प्रत्येकजण विविध पात्रांमध्ये, तसेच मालिकेमधील त्यांच्या कथांमध्ये सुरेखरित्या सामावून गेले आहेत. प्रत्येकामध्ये खास नाते निर्माण झाले आहे, जे माझ्यासाठी अत्यंत खास आहे.''
शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी) म्हणाली, ''भाबीजी घर पर है या मालिकेची खासियत म्हणजे मालिका त्वरित लक्ष वेधून घेते. आपल्या सभोवताली अनेक घडामोडी घडत आहेत आणि त्यामधून संकेत घेत मालिकेच्या निर्मात्यांनी अनेकदा या घडामोडींबाबत सीक्वेन्स सादर केले आहेत. यामुळे प्रेक्षक मालिकेशी संलग्न होतात आणि मालिका अधिक उत्तम कलाकृती बनते. भारतामध्ये नोटाबंदी व लॉकडाऊन करण्यात आले तेव्हा प्रेक्षकांसमोर या गोष्टी विशिष्टरित्या सादर करण्यात आल्या, ज्यामुळे मालिका वास्तविकतेशी अधिक संलग्न बनली.''
रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी) म्हणाला, ''मला आजही आठवते, जेव्हा मला समजले होते की मालिका 'भाबीजी घर पर है' ही एकमेकांच्या पत्नींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणा-या दोन पुरूषांची कथा असणार आहे. मी त्वरित समजून गेलो की हा कन्टेन्ट निश्चितच हिट ठरणार. या गोष्टीला सहा वर्षे उलटून गेली आणि आता आम्ही मोठी टीम बनलो आहोत. तसेच चाहते आमच्यावर अतूट प्रेम व पाठिंब्याचा वर्षाव करत आहेत. या यशासाठी प्रेक्षक व टीमचे मन:पूर्वक आभार.''
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.