आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रेशन टाइम:'हप्‍पू की उलटन पलटन'ला दोन वर्षे पूर्ण, सेटवर केक कापून कलाकारांनी केले सेलिब्रेशन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलाकारांनी हा सुवर्णक्षण डान्स करत आणि केक कापत साजरा केला.

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'ने दरोगा हप्‍पू सिंग (योगेश त्रिपाठी), त्‍याची पत्‍नी दबंग दुल्‍हनिया राजेश (कामना पाठक) आणि हट्टी आई कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी) यांचे कौटुंबिक गैरसमज व विनोदी घटनांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याची दोन वर्षे पूर्ण केली आहेत. हप्‍पूच्‍या विनोदी चुका, राजेशचे विलक्षण प्रत्‍युत्तर आणि अम्‍माचा बुलंद अंदाज यांसह हे त्रिकूट प्रेक्षकांची मने जिंकत आहे आणि प्रेक्षकांच्‍या आवडीचे बनले आहे. मनोरंजनपूर्ण कथानकासह वैशिष्‍ट्यपूर्ण पात्रं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मालिकेला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलाकारांनी हा सुवर्णक्षण डान्स करत आणि केक कापत साजरा केला.

मालिकेचे निर्माते संजय कोहली या यशाबद्दल म्‍हणाले, ''मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन' माझ्यासाठी व माझ्या टीमसाठी खूपच प्रिय आहे. आम्‍ही या प्रकल्‍पासाठी अथक मेहनत घेतली आणि उत्तम कामगिरी केली आहे. मालिकेने आतापर्यंतच्‍या प्रवासादरम्‍यान प्रेक्षकांमध्‍ये योग्‍य स्‍थान निर्माण केले आहे. आम्‍ही पाठिंबा दिलेल्‍या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि आम्‍ही त्‍यांना हसवत राहण्‍याची आशा करतो.''

दरोगा हप्‍पू सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता योगेश त्रिपाठी म्‍हणाला, ''प्रतिभावान टीमसोबतचा हा विलक्षण, पण घटनांनी भरलेला प्रवास राहिला आहे. आम्‍ही आजही आमचे पात्र योग्‍य असण्‍याचा सराव करत असताना मला सुरूवातीच्‍या दिवसांची आठवण येते. प्रेक्षक आम्‍हाला आमच्‍या मालिकेमधील नावांनी हाक मारतात तेव्‍हा आम्‍हाला अभिमानास्‍पद वाटते.''

प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करणा-या मालिकेमध्‍ये दोन प्रमुख महिला भूमिका देखील आहेत. कामना पाठकने साकारलेली भूमिका राजेश आणि कटोरी अम्‍माच्‍या भूमिकेत हिमानी शिवपुरी प्रेक्षकांचे आभार व्यक्त करत आहेत. कामना पाठक म्‍हणाली, ''मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'ला इतरांपेक्षा खास बनवणारी बाब म्‍हणजे महिलांचे स्‍थान. हास्‍य व विनोदासह ज्‍याप्रमाणे महिला पात्रांना महत्त्व देण्‍यात आले आहे ते अत्‍यंत सुंदर आहे. राजेश ही एक प्रबळ महिला आहे, जी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्‍यासोब‍त इतर कर्तव्‍ये देखील लीलया पार पाडते. मला या भूमिकेबाबत वर्णन करण्‍यात आले तेव्‍हाच मला समजले की ही भूमिका हिट ठरेल आणि मी त्‍वरित ही भूमिका साकारण्‍याला होकार दिला. आज मला देशभरातील प्रेक्षकांकडून कौतुक मिळत असलेल्‍या या मालिकेचा भाग असण्‍याचा अभिमान वाटत आहे.''

हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्‍या, ''अम्‍माजी म्‍हणून ओळख निर्माण केलेल्‍या या मालिकेची 2 वर्षे अद्भुत राहिली आहेत. सेटवर व सेटबाहेर देखील माझ्या भूमिकेला पसंती मिळत आली आहे. हजरजबाबी असलेली अम्‍माजी निश्चितच माझ्या जीवनाचा भाग बनली आहे. मालिकेने मला एक अशी भूमिका दिली आहे, जिने पुरूषप्रधान समाजाच्‍या गतीशीलतेमध्‍ये पूर्णत: बदल घडवून आणला आहे. स्थितींशी सामना करत असलेल्‍या कथांमध्‍ये संवेदनशीलता असण्‍यासोबत विनोदाचा उत्तम भाग देखील आहे.''

बातम्या आणखी आहेत...