आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Tv Serial Mauka E Vardaat Assistant Art Director LAXMAN SHARMA Dies Of COVID 19, Producers Give Rs 11 Lakh To The Deceased's Family

निधन:'मौका-ए-वारदात'चे सहाय्यक कला दिग्दर्शक लक्ष्मण शर्मा यांचे कोरोनाने निधन, निर्मात्यांनी कुटुंबीयांना केली 11 लाखांची मदत

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूटिंगहून परत आल्यानंतर कोविड 19 पॉझिटिव्ह आले होते लक्ष्मण

'मौका-ए-वारदात' या टीव्ही कार्यक्रमाचे सहाय्यक कला दिग्दर्शक लक्ष्मण शर्मा यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. त्याच्या निधनानंतर शोच्या निर्मात्यांनी आता त्यांच्या कुटुंबीयांना 11 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. याबद्दल फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे सरचिटणीस अशोक दुबे यांनी सांगितल्यानुसार, लक्ष्मण यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

शूटिंगहून परत आल्यानंतर कोविड 19 पॉझिटिव्ह आले होते लक्ष्मण
अशोक दुबे म्हणाले, "लक्ष्मण शर्मा सहाय्यक कला दिग्दर्शक होते. 'मौका-ए-वारदात'चे दिल्लीतील शूटिंग संपवून मुंबईत घरी परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. दुर्दैवाने ते वाचू शकले नाहीत. लक्ष्मण यांच्या निधनानंतर आम्ही शोच्या निर्मात्यांशी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत लक्ष्मण यांच्या पत्नीला मदत म्हणून 11 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. लक्ष्मण यांना दोन लहान मुली आहेत. लक्ष्मणने या कार्यक्रमासाठी आठवडाभर शूटिंग केली होती."

लक्ष्मणच्या निधनाविषयी माहिती देताना त्यांचा मित्र चेतन म्हणाला, "त्याला दिल्लीत ताप आला होता. आम्ही तिथे शूटिंग करत होतो आणि त्यानंतर तो बरा झाला होता. काही दिवसांपूर्वी जेव्हा तो मुंबईत परत आला तेव्हा त्याने कोरोना चाचणी करुन घतेली. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि त्याला गंभीर लक्षणे देखील दिसली होती. आता तो आपल्यात नाही याचे फार वाईट वाटते."

बातम्या आणखी आहेत...