आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Unique Way Adopted To Take Precautions Related To Corona On The Set Of 'Mere Sai' Show, Spreading Awareness By Writing Film Dialogue

खबरदारीचा नवा उपाय:‘मेरे साई’च्या सेटवर लागले खबरदारी घेण्याची पोस्टर्स, चित्रपटातील संवाद लिहून निर्माण करत आहेत जागरुकता

किरण जैन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 जुलै रोजी शूटिंग थांबविल्यानंतर 18 जुलै रोजी शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले.

‘मेरे साई’या टीव्ही मालिकेच्या सेटवर फिजिकल डिस्टन्सिंगबद्दल जागृती करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. जेव्हापासून शूटिंगची सुरुवात करण्यात आली आहे तेव्हापासून फिजिकल डिस्टन्सिंगला प्रमोट करण्यासाठी पूर्ण सेटवर अनोख्या पद्धतीने पोस्टर्स आणि बोर्ड लावले आहेत. या बोर्डमध्ये कोरोना संबंधित खबरदारी घेण्याचे संदेश दिले आहेत.

याबद्दल अभिनेता तुषार दळवी सांगतात, ‘काम पुन्हा सुरू करणे हे उत्साहजनक नक्कीच आहे. जागरुकता निर्माण करण्यासाठी सेटवर चारही बाजुला असेच रंजक बोर्ड लावण्यात आले आहेत, ते बघून आनंद वाटला.’

  • सेटवर कोरोना संक्रमित आढळले होते

या शोचे शूटिंग सुरू झाल्यानंतर सेटवर कोरोना संक्रमित व्यक्ती आढळल्यानंतर शूटिंग थांबविण्यात आली होती. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मालिकेचे निर्माते नितीन वैद्य म्हणाले- आमच्या टीममधील एका सदस्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 7 जुलै रोजी शूटिंग थांबविल्यानंतर 18 जुलै रोजी शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले. चांगली गोष्ट अशी आहे की कोणतीही व्यक्ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आली नव्हती.