आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Unmatched Actor Taher Shabbir Married Girlfriend Akshita Gandhi, Pictures Of Secret Wedding Ceremony Came Out

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या शुभेच्छा:'बेपनाह' फेम अभिनेता ताहेर शब्बीरने गर्लफ्रेंड अक्षिता गांधीसोबत थाटले लग्न, समोर आले सिक्रेट वेडिंगचे सुंदर फोटो

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.

नीती टेलर आणि परीक्षित बावा यांच्यानंतर आता अभिनेता ताहेर शब्बीरनेही यावर्षी लग्न केले आहे. 'बेपनाह' या मालिकेत अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत झळकलेल्या ताहेरने अलीकडेच गर्लफ्रेंड अक्षिता गांधीसोबत सप्तपदी घेतल्या. यापूर्वी 18 ऑगस्ट 2020 रोजी या दोघांनी एका छोटेखानी समारंभात साखरपुडा केला होता. कोविड 19ची परिस्थिती बघता अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.

ताहेरने लग्नाची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दाखवली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ताहेरने अक्षितासोबतची लग्न आणि साखरपुड्याची निवडक छायाचित्रे शेअर केली आहेत. ताहेर लाल आणि पांढ-या रंगाच्या शेरवानीत दिसला तर अक्षिताने हिरव्या आणि सोनेरी रंगाचे कॉम्बिनेशन असलेला लहेंगा परिधान केला होता.

लग्नाची छायाचित्रे समोर आल्यानंतर ताहेरवर इंडस्ट्रीतील मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आकांक्षा रंजन कपूर, नील नितीन मुकेश, शमा सिकंदर यांच्यासह बर्‍याच लोकांनी त्यांना आयुष्याची नवीन सुरुवात केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

ताहेर काही दिवसांपूर्वी हर्द चोप्रा आणि जेनिफर विंगेटसह 'बेपनाह' या टीव्ही मालिकेत दिसला होता. याशिवाय त्याने 'नाम शबाना' आणि 'फॅन' या चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'गिल्टी' या नेटफ्लिक्सच्या चित्रपटात कियारा आडवाणीसह ताहेरची महत्त्वाची भूमिका होती.

बातम्या आणखी आहेत...