आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता वरुण धवनच्या म्हणण्यानुसार आयुष्मान खुराणा, कार्तिक आर्यन आणि विकी कौशल या तीन ए-लिस्टरने त्याला सारा अली खानपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हा खुलासा स्वतः वरुणने 'द कपिल शर्मा शो'च्या मंचावर केला. वरुण आणि सारा हे दोघेही द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या आगामी 'कुली नं.1' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. येत्या शनिवार आणि रविवारी टेलिकास्ट होणा-या या स्पेशल एपिसोडचा प्रोमो मंगळवारी रिलीज करण्यात आला.
वरुण-सारामधील मजेदार संभाषण
प्रोमोमध्ये वरुण कपिलला सांगतोय, "मी जेव्हा तिच्यासोबत काम करत होतो तेव्हा आयुष्मान, कार्तिक, विकी कौशल यांनी मला मेसेज केला होता." यावर साराने वरुणला विचारले, "काय म्हणाले
होते?" त्यावर उत्तर देताना वरुण म्हणाला, "सांभाळून राहा." यानंतर सारा आणि वरुणच नव्हे तर 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर उपस्थित सर्वांना हसू आवरले नाही.
25 डिसेंबरला प्रदर्शित होतोय चित्रपट
डेव्हिड धवन दिग्दर्शित 'कुली नं. 1' हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 1995 मधील याच नावाच्या सुपरहिट चित्रपटाचा हा रिमेक असून यात गोविंदा आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होते. तर डेव्हिड धवन यांनी तो दिग्दर्शित केला होता.
जुन्या चित्रपटात कादर खान, सदाशिव अमरापूरकर, शक्ती कपूर आणि कांचन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तर नवीन चित्रपटात परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव आणि शिखा तलसानिया यांच्या भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.