आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत पन्नास वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिलेले विश्वमोहन बडोला यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. ते एक गायक आणि पत्रकारदेखील होते. प्रवासाची आवड म्हणून त्यांनी दोनदा वर्ल्ड टूर केला होता. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची सून आणि वरुण बडोलाची पत्नी राजेश्वरी सचदेवने दिली आहे.
वरुणने वडिलांसाठी लिहिले भावनिक पत्र
वडिलांच्या निधनानंतर वरुण बडोलाने मंगळवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्यासाठी एक भावनिक पत्र लिहिले. वरुण लिहितो -''बरेच लोक म्हणतात की त्यांची मुले त्यांचे ऐकत नाहीत. पण ते विसरतात की मुले नेहमीच त्यांना बघत असतात. माझ्या वडिलांनी कधीही मला शिकवण्यासाठी बसवले नाही. त्यांनी माझ्यासाठी शिकण्याचा मार्ग तयार केला. त्यांनी असे उदाहरण सेट केले, जे फॉलो केल्याशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता'', असे वरुण म्हणतो.
वरुणने पुढे लिहिले, ''लोक मला तुमचा मुलगा म्हणून जज करतात म्हणून मी विरोध केला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, जर माझे नाव तुझ्यासाठी अडथळा आहे, असे वाटत असेल तर जा आणि तुझी स्वतःची ओळख बनव. त्यांनी मला नेहमी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी मला माणूस बनवले. ते एक लीजेंड होते, पण माझ्यासाठी ते माझे पिता होते. ज्यांना बघायचो आणि ऐकायचो. आता ते नाहीत परंतु त्यांचा वारसा नेहमीच अनेक स्वरूपात राहील,'' अशा शब्दांत वरुणने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
शेवटचा चित्रपट होता 'मिसिंग'
विश्वमोहन म्हणजेच व्हीएम बडोला यांनी आपले संपूर्ण आयुष्य कलेसाठी समर्पित केले होते. ते नाट्यक्षेत्रातही सक्रिय होते. त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी सुमारे 400 नाटकांमध्ये काम केले. अभिनेता म्हणून जोधा अकबर, मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटांसह अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्येही ते दिसले. त्यांनी अखेरचे मनोज बाजपेयी आणि तब्बू स्टारर 'मिसिंग' चित्रपटात काम केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.