आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौन बनेगा करोडपती -13:दृष्टीहीन हिमानी बुंदेला ठरल्या कौन बनेगा करोडपती -13 च्या पहल्या करोडपती, मुलांना देतात गणिताचे धडे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या 15 व्या वर्षी हिमानी बुंदेला यांनी गमावली दृष्टी

‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय शो छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. 23 ऑगस्ट रोजी या शोचा प्रीमिअर झाला आणि शोला पहिले करोडपती स्पर्धक मिळाली आहे. KBC 13 च्या एका प्रोमोत स्पर्धक हिमानी बुंदेला हॉट सीटवर दिसत आहेत. त्यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आहे. तर आता त्या 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. त्या ‘कौन बनेगा करोडपती 13’ च्या पहिल्याविजेता ठरल्या आहेत.

हिमानी या आग्रा येथे शिक्षिका आहेत. या शोमध्ये त्या आपल्या वडिलांसोबत पोहोचल्या. आपल्या मुलीचा अभिमान वाटत असल्याचे हिमानी यांच्या वडिलांनी म्हटले आहे. हिमानी या दृष्टीहीन आहेत. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे हिमानी यांची स्तुती करताना दिसत आहेत.

वयाच्या 15 व्या वर्षी गमावली दृष्टी
हिमानी यांचे वडील विजय बुंदेला यांनी सांगितले की, हिमानी 15 वर्षांच्या असताना एका अपघातात त्यांची दृष्टी गेली. डॉक्टर व्हायचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हिमानी यांना त्यांचे भविष्य अंधारात दिसू लागले. मात्र कुटुंबीयांच्या प्रोत्साहनाने त्यांनी ग्रॅज्युएशन केले आणि त्यांनी बीएडसाठी त्यांचे केंद्रीय विद्यालयात सिलेक्शन झाले. हिमानी यांनी सांगितल्यानुसार, मागील पाच वर्षांपासून त्या केबीसीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करत होत्या.

हिमानी यांनी ऐकवली कविता
एप्रिल महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात हिमानी यांनी केबीसीकडून कॉल आला, तेव्हा त्यांना क्षणभर विश्वासच बसला नाही. पहिले दोन कॉल मी कट केले होते, पण तिस-यांदा जेव्हा कॉल आला तेव्हा तो रिसिव्ह केला, असे त्यांनी सांगितले. हिमानी यांनी अपंग मुलांसाठी समाजात जागरुकता आणण्याची मोहिम हाती घेतली आहे. या शोमधून जिंकलेल्या सगळ्या पैशांचा वापर हिमानी या त्यांच्या मोहिमेसाठी करणार आहेत. या शोमध्ये हिमानी यांनी एक सुंदर कवितादेखील ऐकवली. त्या म्हणाल्या, "यूं तो जिंदगी सब काट लेते हैं यहां मगर जिंदगी जियो ऐसे की मिसाल बन जाए.'

बातम्या आणखी आहेत...