आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त छोट्या पडद्यावरील गाजत असलेली 'भाबीजी घर पर है' या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने तिच्या आयुष्यातील आदर्श महिलांबद्दल सांगितले. वहीदा रेहमानजी आणि शर्मिला टागोरजी या दोन महिलांकडे मी नेहमीच माझे आदर्श म्हणून पाहते. मी त्यांच्या कामाचे कौतुक करते आणि त्या आपणा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत, असे शुत्रांगी सांगते. सोबतच आजच्या पिढीमधील अभिनेत्रींमध्ये मला अनुष्का शर्मा खूप आवडते. ती एक निश्चयी महिला आहे, जिने काहीच न करता तिच्या कार्यामधून स्वत:चे महत्त्व स्थापित केले आहे. या इंडस्ट्रीव्यतिरिक्त मला प्रभावित केलेली महिला म्हणजे माझी आई. मी आज जे कोणी आहे, त्यासाठी नेहमीच तिची कृतज्ञ राहीन, असे शुभांगी म्हणाली.
मागील वर्षभरापासून आपण सर्वजण महामारीचा सामना करत आलो आहोत. जगामध्ये लॉकडाऊन व आर्थिक मंदी असण्याच्या काळादरम्यान तू तुझे काम योग्यरित्या कशाप्रकारे ठेवलेस, असा प्रश्न शुभांगीला विचारला असता, ती म्हणाली, 'महामारीदरम्यान सर्वकाही ठप्प झाले. यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करण्यास मिळाला आणि आपण पूर्वी करू न शकलेल्या काही गोष्टी करण्यास देखील वेळ मिळाला. माझी नेहमीच माझी मुलगी व पतीसेाबत असण्याची आणि त्यांच्यासोबत वेळ व्यतित करण्याची इच्छा होती. लॉकडाऊनदरम्यान माझी मुलगी व मी चित्रकला व हस्तकलेसह बेकिंगमध्ये गुंतून गेलो. आम्ही दोघींनी एकत्रित या क्षणांचा आनंद घेतला. मी माझ्या कुटुंबासाठी अनेक नवीन पदार्थ तयार केले आणि नवीन गोष्टींसह प्रयोग केला. आम्ही गेम्स खेळलो, माझ्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी टिकटॉक व्हिडिओज बनवले आणि सोशल मीडियावर लाइव्ह जात त्यांच्यासोबत सवांद साधला. मी कथ्थक देखील शिकवले. मी माझ्या आवडी आणि शारीरिक व मानसिक आरोग्यावर फोकस करणे सुरूच ठेवले. मी स्वत:ला तंदुरूस्त, उत्साही व आरोग्यदायी ठेवण्यासाठी चिंतन, योगासोबत नृत्याचा सराव केला. लॉकडाऊननंतर कडक सुरक्षितता नियम आणि नवीन शूटिंग मार्गदर्शकतत्त्वांतर्गत पुन्हा सुरूवात करणे सुरूवातीला अवघड गेले. सुरूवातीला अनेक प्रतिबंध व शंका होत्या.पण काळासह सर्वकाही सुरळीत वाटू लागले. या महामारीदरम्यान मी आपल्या जीवनाचा भाग म्हणून आव्हानांचा स्वीकार करत त्यांचा धैर्याने सामना करण्यास शिकले,' असे शुभांगीने सांगितले.
अंगुरी भाभी या भूमिकेची खासियत सांगताना शुभांगी म्हणाली, 'अंगूरी ही कानपूरमधील साधी-भोळी व निरागस महिला आहे, जी सुसंस्कृत व पारंपारिक आहे. ती मोहक असण्यासोबत कधी-कधी मूर्खासारखी वागते आणि तिच्या पती मनमोहन तिवारीची (रोहिताश्व गौड) निष्ठावान पत्नी आहे. अंगूरी ही माझ्या जीवनातील सर्वात लक्षणीय भूमिका राहिली आहे. मी ही भूमिका साकारण्याचा पूर्णपणे आनंद घेत आहे. या भूमिकेमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली आहे आणि घराघरामध्ये माझी ओळख निर्माण झाली आहे. मला इतके प्रेम व प्रशंसा मिळण्याचा खूप आनंद होत आहे. पण प्रत्यक्ष जीवनात मी अंगूरीसारखी नाही.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.