आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता करणवीर मेहरा आणि निधी सेठ रविवारी नवी दिल्लीतील एका गुरुद्वारात लग्नाच्या बेडीत अडकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या 30 जणांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठी बांधली. करणवीरने सांगितले की, आम्ही लग्नासाठी फक्त 30 पाहुण्यांना आमंत्रित केले होते. ज्यांना लग्नात बोलावू शकलो नाही त्या सर्व मित्रपरिवारासाठी मुंबईत एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.
निधीने 24 जानेवारीची तारीख का निश्चित केली?
निधी सेठ म्हणाली की, "आम्ही काही तारखा शॉर्टलिस्ट केल्या होत्या, त्यापैकी एक डिसेंबरची तारीखही होती. पण, आम्हाला 2020 मध्ये नवीन आयुष्याला सुरुवात करायची नव्हती. म्हणून जानेवारी 2021 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही ऑनलाईन चेक केले असता 24 जानेवारी ही शुभ तारीख असल्याचे मला कळले. त्यादिवशी मी शुटिंगही करत नव्हते आणि म्हणूनच आम्ही लग्नासाठी ही तारीख निश्चित केली. "
करण आणि निधीची भेट कशी झाली?
करणवीर आणि निधीची पहिली भेट 2008 मध्ये एका कमर्शियलच्या सेटवर झाली होती. हे दोघे तीन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा भेटले. त्यावेळी करणवीर अभिनेत्यासह निर्माता झाला होता आणि त्याने निधीला त्याच्या मालिकेत काम करण्याची ऑफर दिली होती. करणवीरने 2005 मध्ये 'रीमिक्स' चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर तो रागिनी एमएमएस 2, मेरे डॅड की मारुती, ब्लड मनी, बदमाशियां आणि आमिन सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला.
करण मेहराचे हे दुसरे लग्न
करण मेहराने 2009 साली त्याची बालमैत्रीण देविकाबरोबर लग्न केले होते. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. निधीच्या रुपात करणला पुन्हा एकदा प्रेम गवसले. आणि आता हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.