आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोण आहे प्रीतिका चौहान?:ड्रग्ज प्रकरणात झाली अटक, अनेक पौराणिक मालिकांमध्ये साकारली देवीची भूमिका, फ्लॉप चित्रपटाद्वारे केली होती करिअरची सुरुवात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवो के देव महादेव या मालिकेमुळे प्रीतिका चौहान खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे. आता या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान हिला 99 ग्रॅम गांजासह अटक केली आहे. शनिवारी एनसीबीच्या मुंबई युनिटच्या अधिका्यांनी सापळा रचून प्रीतिकाला वर्सोवा भागातून अटक केली. वर्सोवा येथे राहणा-या दीपक राठोडकडून ड्रग्ज खरेदी केल्याचे तिने कबुल केले आहे. प्रीतिकाला कोर्टाने 8 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यापासून प्रीतिका सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ती कोण आहे हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे? चला तर मग प्रीतिकाविषयी जाणून घेऊया ...

हिमाचल प्रदेशात जन्म

प्रीतिका मुळची हिमाचल प्रदेशच्या कर्सोगची रहिवासी आहे. तिचा जन्म 19 मार्च 1990 रोजी कर्सोगच्या महुनाग गावात झाला. तिच्या वडिलांचे नाव हकम सिंह चौहान आणि आईचे नाव कमला चौहान आहे. तिला एक बहीण असून शिवानी चौहान तिचे नाव आहे. प्रीतिका बी. टेक पदवीधर आहे.

पौराणिक मालिकांमधून मिळाली ओळख

प्रीतिकाने 2016 मध्ये 'झमेला' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. यानंतर प्रीतिका छोट्या पडद्याकडे वळली. पौराणिक मालिकांमध्ये देवीची भूमिका साकारण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. प्रीतिकाने 'संकट मोचन महाबली हनुमान' या मालिकेत देवी शचीची भूमिका साकारली आहे.

याशिवाय ती स्टार भारतच्या 'जग जननी माँ वैष्णो देवी' या मालिकेत भूदेवीच्या भूमिकेतही झळकली होती. 'संतोषी माँ-सुनाए व्रत कथाएं' या मालिकेत तिने अलीकडेच देवी पार्वतीची भूमिका साकारली होती. याशिवाय ती 'देवों के देव महादेव' या मालिकेसह 'सीआयडी' आणि 'सावधान इंडिया'मध्येही दिसली होती.

16 ऑक्टोबर रोजी लिहिली शेवटची पोस्ट

प्रीतिका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने स्वतःचा उल्लेख करताना एकटी आणि स्वतंत्र म्हटले आहे. 16 ऑक्टोबर रोजी तिने शेवटची पोस्ट लिहिली होती. प्रीतिकाने स्वतःचा एक फोटो शेअर करुन लिहिले, आपल्याला कुणी दुखावले आणि वेदना दिल्या हे महत्त्वाचे नसते, तर आपल्या पाठीशी कोण उभे आहे आणि कुणामुळे आपल्या चेह-यावर हास्य फुलले हे जास्त महत्त्वाचे असते.

बातम्या आणखी आहेत...