आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकाचा दावा:केबीसी 13 मध्ये विचारला गेला संसद बैठकीवर चुकीचा प्रश्न, शोचे निर्माते सिद्धार्थ बसू यांनी सोशल मीडियावर दिले स्पष्टीकरण

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसद बैठकीवर विचारला गेला होता प्रश्न

छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती 13' या कार्यक्रमात अलीकडेच प्रसारित झालेल्या भागामध्ये स्पर्धकाला विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर चुकीचे असल्याचे एका प्रेक्षकाने सोशल मीडियावरून निदर्शनास आणून दिले आहे. त्यावर कार्यक्राचे निर्माते सिद्धार्थ बसू यांनी या प्रेक्षकाला आमची कोणतीही चूक झालेली नाही, असे उत्तर दिले आहे. प्रेक्षकाचा दावा आहे की, केबीसीत विचारला गेलेला प्रश्नच चुकीचा होता.

संसदच्या बैठकीवर विचारला गेला होता प्रश्न
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर आलेल्या स्पर्धक दीप्ती तुपे यांना प्रश्न विचारला होता की, 'साधारणपणे, भारतीय संसदेची प्रत्येक बैठक कशाने सुरू होते?' यावर अचूक उत्तर ‘प्रश्नोत्तराचा तास’ असल्याचे दाखवण्यात आले.

प्रेक्षकाचा दावा प्रश्नच चुकीचा होता
प्रेक्षक आशिष चतुर्वेदी यांनी याचा स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हटले की, '@KBCsony आजच्या एपिसोडमध्ये विचारलेला प्रश्न आणि त्याचे दिलेले उत्तर दोन्हीही चुकीचे होते. मी टीव्हीवर संसदेच्या अनेक बैठका पाहिल्या आहेत. लोकसभेची बैठक सामान्यपणे शून्य तासाने सुरू होते आणि राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाने बैठकीची सुरुवात होते.' त्यांनी अमिताभ बच्चन, सिद्धार्थ बसू आणि लोकसभा सेकेट्रिएटला टॅग करत लिहिले की, कृपया तपासून पहा.

शोच्या निर्मात्यांनी दिले उत्तर
आशिष यांनी केलेल्या ट्विटवर केबीसी 13 चे निर्माते सिद्धार्थ बसू यांनी उत्तर देताना लिहिले, 'कोणतीही चूक झालेली नाही. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांसाठी असलेले हँडबुक तुम्ही तपासून पहा. दोन्ही सभागृहांमध्ये स्पीकर किंवा अध्यक्षांनी विशेष निर्देश दिलेले नसतील तर, सर्वसाधारपणे बैठका या प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू होतात. त्यानंतर शून्य तास सुरू होतो.'

वेबसाइटवर असलेली माहिती तपासून पाहिली
निर्माता सिद्धार्थ बसू यांच्या या उत्तरावर आशिष चतुर्वेदी यांनी पुन्हा ट्विट करत लिहिले, 'बसू, तुम्ही दिलेल्या उत्तरासाठी धन्यवाद. मी लोकसभा आणि राज्यसभेच्या वेबसाइट्सवर माहिती तपासून पाहिली. दोन स्क्रीनशॉट्समधून स्पष्ट होतंय की प्रश्न आणि उत्तर दोन्ही चुकीचे होते. राज्यसभेची बैठक सकाळी 11 वाजता सुरू होते हे नमूद करणे आवश्यक आहे.'

शोला 21 वर्षे झाली पूर्ण
कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम 2000 साली सर्वांत पहिल्यांदा प्रसारित झाला. या कार्यक्रमाला आता 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला बक्षिसाची अंतिम रक्कम ही एक कोटी रुपये इतकी होती. आता ती रक्कम वाढवून सात कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. सुरुवातीपासून अमिताभ बच्चन हा शो होस्ट करत आले आहेत. केवळ केबीसी 3 हे पर्व शाहरुख खानने होस्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...