आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • 'ye Rishta Kya Kehlata Hai' Serial Fame Karan Mehra Arrested By Mumbai Police, Accused Of Assaulting His Wife

मुंबईत टीव्ही अभिनेत्याला अटक:‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहरावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण मेहराविरोधात त्याची पत्नी निशा रावलने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

टीव्हीवरील गाजलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलता है’ या मालिकेत नैतिक ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहराला मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. करणची पत्नी अभिनेत्री निशा रावलने करणसोबत झालेल्या वादानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. करण मेहराविरोधात भांदवी कलम 336, 337, 332, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण मेहराविरोधात त्याची पत्नी निशा रावलने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून करण आणि नेहा यांच्या वैवाहिक आयुष्यात वितुष्ठ निर्माण झाल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दोघांत कडाक्याचे भांडण झाले आणि हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. त्यानंतर नेहा रावलने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी करण मेहराला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावले. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच करणला झाली होती कोरोनाची लागण
काही दिवसांपूर्वीच करण मेहराला कोरोनाची लागण झाली होती. याविषयी बोलताना तो म्हणाला होता की, 'माझ्या आणि निशात सर्वकाही आलबेल आहे. मी नुकताच पंजाबमध्ये शूटिंग करत होतो. माझ्या सेटवर काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. मी चाचणी केली जी निगेटिव्ह आली. पण मुंबईत परतल्यानंतर मी पुन्हा चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली. आता मी घरात क्वारंटाईन झालोय. आमच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याच्या बातम्या कुठून येत आहेत माहित नाही. मात्र हे सर्व खोटं आहे. माझी पत्नी निशा माझी काळजी घेतेय,' असे करणने सांगितले होते.

2012 मध्ये झाले होते लग्न
अभिनेता करण मेहराची पत्नी निशा रावल हीदेखील एक अभिनेत्री आहे. या दोघांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक चार वर्षांचा मुलगा असून काविश असे त्याचेन नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...