आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत गुलाबोची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिला कोरोनाची लागण झाली असून तिची प्रकृती नाजूक आहे. सध्या तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. दिव्याच्या आईने ‘टाइम्स ऑफ इंडिया’सोबत बोलताना ही माहिती दिली. नुकतेच तिचे आई व भाऊ मुंबईत आले आहेत. काही दिवसांपूर्वी दिव्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसीयूतून स्वतःचा एक फोटो शेअर करत लोकांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा - दिव्या
दिव्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला चाहत्यांना प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. ती म्हणाली, "मला लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी कृपया प्रार्थना करा. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम." स्क्रीनशॉटमध्ये दिव्या हॉस्पिटलच्या बेडवर दिसतेय.
आईने केले रुग्णालयात दाखल
दिव्याच्या आईने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “गेल्या सहा दिवसांपासून दिव्याची प्रकृती खालावली आहे. तिला बरं वाटत नाहीये. दिव्याच्या आजारपणाविषयी समजल्यानंतर मी दिल्लीवरुन घरी आले आणि दिव्याची ऑक्सिजनची पातळी तपासली. त्यावेळी तिची ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी झाली होती. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती नाजूक आहे. नुकतेच तिचे रिपोर्ट आले आहेत, ज्यात तिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे”, असे दिव्याच्या आईने सांगितले.
प्रॉडक्शन हाऊसकडून आर्थिक मदत
दिव्या शशी-सुमित प्रॉडक्शन हाऊसच्या 'तेरा यार हूं मैं' या मालिकेत मध्ये काम करत आहे. दिव्याच्या आईने सांगितल्यानुसार, दिव्याचा भाऊ प्रॉडक्शन हाऊसच्या संपर्कात आहे. प्रॉडक्शन हाऊस दिव्याच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करत आहे.
पतीला म्हटले फ्रॉड
दिव्याच्या आईने तिच्या पतीला फ्रॉड म्हटले आहे. आईने सांगितल्यानुसार, दिव्याचा नवरा तिला सोडून गेला असून तिच्या प्रकृतीविषयी साधी विचारणादेखील केली नाही. 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'तेरा यार हूं मैं' शिवाय दिव्याने 'उडान', 'जीत गई तो पिया मोरे' आणि 'विष' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.