आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. करण मेहराची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला असून गेल्या 14 महिन्यांपासून कोर्टात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरु आहे. आता अलीकडेच करणने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निशावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यादरम्यान निशा रावलचे तिचा मानलेला भाऊ रोहित सेठियासोबत विवाहबाह्य संबंध आहेत, असा आरोप करणने निशावर केला आहे.
निशा आणि रोहित गेल्या 14 महिन्यांपासून माझ्या घरी राहत आहेत
करण मेहराने सांगितले की, "14 महिन्यांपासून रोहित सेठिया नावाचा एक व्यक्ती निशासोबत माझ्या घरी राहत आहे. या व्यक्तीसोबत निशाचे विवाहबाह्य संबंध आहेत. रोहित हा निशाचा मानलेला भाऊ आहे. त्यानेच निशाचे कन्यादान केले होते. गेल्या 14 वर्षांपासून तो निशाकडून राखी बांधून घेत असल्याचे मी पाहिले आहे. पण आज दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. रोहित स्वतः विवाहित आहे आणि त्याला 7 वर्षांची मुलगी देखील आहे. मुळचा लखनऊचा रहिवासी असलेला रोहित माझ्या पत्नीसोबत राहतो आणि निशाची आई लक्ष्मी रावल यांनाही याची माहिती आहे," असे करणने यावेळी सांगितले.
मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे
करण मेहराने पुढे सांगितल्यानुसार, तो गेल्या 14 महिन्यांपासून निशा रावलच्या विरोधात पुरावे गोळा करतोय. करणने पुरावा म्हणून सुमारे 1400 पानांची फाइल तयार केली आहे, जी त्याने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात सादर केली आहे. यासंदर्भात बोलताना करण पुढे म्हणाला, "प्रत्येकाला वाटते की पुरुषच कायमच चुकीचा असतो. परंतु जर मी हे सत्य सांगितले नाही तर नेहमी मीच चुकीचा समजलो जाईल. निशा आणि रोहित सेठियाकडून मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मी तुम्हाला हे सत्य सांगत आहे जेणेकरून उद्या मला काही झाले तर तुम्हाला सत्य ठाऊक असायला हवे,” असे करण म्हणाला.
करण आणि निशा यांनी गेल्या वर्षी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि दोघेही मुलगा कविशच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. गेल्या वर्षी निशा रावलने करणविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा एफआयआर दाखल केला होता आणि पतीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोपही केला होता. त्यानंतर करणने हे आरोप फेटाळून लावले होते. 24 नोव्हेंबर 2012 रोजी निशा आणि करणचे लग्न झाले होते. लग्नाच्या 5 वर्षानंतर त्यांचा मुलगा कविशचा जन्म झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.