आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती हिंसाचार प्रकरण:करण मेहरा आणि त्याच्या कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल, निशा रावलने करणवर तिच्या खात्यातून 1 कोटी रुपये काढल्याचाही आरोप केला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांच्या एफआयरमध्ये करणने निशाला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहराच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्याची पत्नी निशा रावल हिच्या तक्रारीनंतर करण आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करणची पत्नी निशा हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. करणसह त्याच्या कुटुंबातील सदस्य अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा यांची देखील नावे तक्रार अर्जामध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

निशाने तक्रारीत काय म्हटले?

पोलिसांच्या एफआयरमध्ये करणने निशाला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर करणच्या कुटुंबातील अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा यांनी देखील मारहाण केल्याचा आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. करणने परवानगी न घेता आपल्या बँक खात्यामधून एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढल्याचा आरोपही निशाने केला आहे. करणविरोधात पुरावे मिळाल्यास त्याला अटक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. निशाने 31 मे रोजी करणच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देखील होती. त्यावर पोलिसांनी प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर 25 जून रोजी तक्रार दाखल करून घेतली आहे. सध्या या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही.

2017 मध्ये निशा रावल आणि करण मेहरा यांचा मुलगा कविशचा जन्म झाला.
2017 मध्ये निशा रावल आणि करण मेहरा यांचा मुलगा कविशचा जन्म झाला.

31 मे रोजी हे प्रकरण पोलिसांसमोर आले
31 मे रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात निशाच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी करणला अटक केली होती. मात्र काही तासांनंतरच त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. 1 जून रोजी निशाने पत्रकार परिषद घेऊन आपली आपबीती कथन केली होते. तिने करणवर मारहाण आणि डोके फोडल्याचा आरोप केला होता. यासह करणचे विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलासा तिने यावेळी केला होता. निशाच्या म्हणण्यानुसार ती वारंवार करणला माफ करत राहिली. पण जेव्हा तिला मारहाण झाली तेव्हा मुलगा काविशसाठी तिला मीडियासमोर यावे लागले.

निशा म्हणाली होती की, करणने स्वतः विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली
निशा रावल हिने करणविरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. करणवरील आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा नीशाने केला. पती करण मेहराच्या फोनवर काही मेसेज सापडल्यानंतर त्याच्या अफेअर बद्दल लक्षात आल्याचे ती म्हणाली होती. निशाने सांगितले होते की, 'करणचे दुसर्‍या मुलीशी प्रेमसंबंध आहेत, याबद्दल मला काहीच माहित नव्हते. मात्र नंतर जेव्हा मला याबद्दल समजले, तेव्हा मी करणला याबद्दल विचारणा केली आणि त्यानेही त्याच्या आयुष्यात एक मुलगी असल्याचे स्वीकारले.' इतकेच नाही तर त्या मुलीशी शारीरिक संबंध असल्याची कबुली करणने दिल्याचे निशाने सांगितले होते.

करणचा दावा - निशाने स्वत:च भींतीवर डोके आपटले होते
दरम्यान त्याआधी करणने त्याची बाजू मांडताना निशा बायपोलर आणि आक्रमक आहे तसेच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता. तो म्हणाला होता, 'निशाच्या म्हणण्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी फोनवर बोलण्यासाठी खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिने माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिने मला दिली होती. त्यानंतर तिने स्वतःचे डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचे सर्वांना सांगितले.'

बातम्या आणखी आहेत...