आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वर्च्युअल पार्टी:टेलिव्हिजनवर नवीन एपिसोड सुरू होत असताना झी टीव्हीचे कलाकार कनेक्ट झाले चाहत्यांसोबत वर्च्युअल सेलिब्रेशनमध्ये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झी टीव्हीवरील अग्रगण्य कलाकारांनी होस्ट केलेल्या मजेदार आणि संवादपूर्ण वर्च्युअल पार्टीमध्ये अनेक चाहत्यांनी केली धमाल

सध्या झी टीव्हीच्या सर्व कलाकारांसाठी हा क्षण सेलिब्रेशनचा आहे कारण ते पुन्हा एकदा सुमारे चार महिन्यानंतर आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यात झी टीव्हीवरील लोकप्रिय शोच्या माध्यमातूनप्रवेश करणार आहेत. लॉकडाऊन आता हळूहळू उठत चालला असून देशभरातील लोक न्यू नॉर्मलमध्ये प्रवेश करत असताना भारतातील अग्रगण्य हिंदी मनोरंजन वाहिनी झी टीव्हीने आपल्या दैनंदिन प्राईम टाईम मालिकांचे चित्रीकरण सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू केले असून 13 जुलै रोजी त्यांनी लोकप्रिय मालिकांचे नये किस्से नये एपिसोड पुन्हा एकदा सुरू केले. हा कमबॅक साजरा करण्यासाठी ‘कुमकुम भाग्य’,  ‘कुंडली भाग्य’,  ‘गुड्डन… तुमसे ना हो पायेगा’ आणि ‘कुर्बान हुआ’ या मालिकांमधील कलाकारांनी वर्चुअली पार्टी केली आणि मस्त वेळ व्यतीत केला. पण ते यात एकटे नव्हते. जगभरातील ‘झी कुटुंब’ चा भाग बनलेल्या त्यांच्या चाहत्यांनीही ह्या ‘सुनहरी शाम’ ऑनलाइन सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला.

आपल्या खास चाहत्यांसाठी रोमांचक आणि मनोरंजक वातावरण निर्माण करताना या कलाकारांनी अगदी धमाल केली. ‘कुमकुम भाग्य’ मधील मुग्धा चाफेकर आणि कृष्णा कौल यांनी आपल्या सहकलाकारांना पुन्हा एकदा भेटण्याचे अनुभव सांगितले आणि न्यू नॉर्मल किस्सेही. आता एकमेकांना मिठी मारणे बंद, लांबूनच स्पर्श न करता हायफाय देण्याची नवीन पद्धत याबद्दलही त्यांनी सांगितले. ‘गुड्डन… तुमसे ना हो पायेगा’ मधील निशांत सिंग मलकानीने ‘कुर्बान हुआ’ मधील अभिनेता करण जोटवानीने व्हिडिओ कॉलच्या वेळेसही मास्क घातल्याबद्दल फिरकी घेतली आणि तो म्हणाला, “व्हिडिओ कॉल मधून कोरोना होणार नाही…” तेव्हा करणच्या वतीने सहकलाकार प्रतिभा रांता आणि ‘कुंडली भाग्य’मधील मनित जौरा यांनी असे म्हटले की करण खरंतर प्रेक्षकांसाठी त्यांच्या सुरक्षिततेकरिता मास्क घालण्याचे चांगले उदाहरण दाखवत आहे.

लॉकडाऊनमधील अनुभव आणि #13thKiTayyari बद्दल सांगताना टीव्हीच्या कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांसमोर अंताक्षरीचा मजेदार खेळही खेळला. एकामागोमाग गाताना त्यांनी त्यांच्या आवडीची अनेक गाणी गायली. ह्या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांचे मन जिंकले. मात्र आपल्या गोड आवाजाने मुग्धाने चाहत्यांना थक्कच केले. ज्या पद्धतीने तिने ‘तू मिले दिल खिले’ हे गाणे गायले त्यावरून बाकी कलाकारांनी ती सध्याच्या लिटल चॅम्प्सचा हिस्सा आहे की काय अशी तिची खोडी काढली. तेव्हाच लिटल चॅम्प्समधून काही स्पर्धक या कॉलवर आले आणि त्यांनीही झी टीव्हीच्या सुपर फॅन्सचे मनोरंजन केले.

आपल्या आवडत्या कलाकारांना आपल्या समोर पाहून प्रेक्षक खूश झाले. कलाकारांनीही त्यांचा हा आनंद त्यांच्यासोबत व्यक्तिगत स्तरावर संवाद साधून आणखी द्विगुणीत केला. लॉकडाऊनमधील त्यांच्या वेळापत्रकाबद्दलचे प्रश्न ते चित्रीकरण पुन्हा सुरू करताना ते घेत असलेली काळजी अशा सगळ्या बाबतीतील प्रश्नांची उत्तरे सर्वच कलाकारांनी अतिशय दिलखुलासपणे दिली आणि आपल्या चाहत्यांसोबत एक मस्त संध्याकाळ व्यतीत केली.

आपले चाहते आणि सहकलाकार यांसोबत पुन्हा एकदा जोडले जाण्याच्या अनुभवाबद्दल ‘कुमकुम भाग्य’ ची अभिनेत्री मुग्धा चाफेकर उर्फ प्राची म्हणाली, “आता बराच काळ लोटला की आम्ही सगळे एकमेकांपासून दूर होतो आणि आता पुन्हा एकदा झी टीव्हीवरील माझे सहकलाकार आणि खासकरून चाहते यांच्याशी पुन्हा एकदा कनेक्ट होताना खूप छान वाटतंय. आमचे चाहते आमच्या परतण्याची वाट पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने आमच्या चेहऱ्यावर हसू आणले. त्यांच्यासोबत संवाद साधत आणि त्यांचे मनोरंजन करत आम्ही मस्त संध्याकाळ घालवली. आम्हाला आशा आहे की ते आमचा ‘कुमकुम भाग्य’ हा शो असाच पाहत राहतील आणि आमच्यावर त्यांचे प्रेम दर्शवतील.”

आपल्या अनुभवांमध्ये आणखी भर टाकत कुर्बान हुआचा अभिनेता करण जोटवानी उर्फ नील म्हणाला, “कामावर परत येण्याची ही भावना अतिशय उत्साहजनक आहे पण त्याहूनही अधिक उत्साहजनक हे आहे की आमचे चाहतेसुद्धा आम्हाला पाहून अतिशय आनंदात आहेत. ही प्रतीक्षा त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठीही अतिशय दीर्घ होती पण आता नवीन एपिसोडसह जी नाट्यमय वळणे येतील ती निश्चितपणे रोमांचक असतील. परत येताना आम्ही अतिशय आनंदात आहोत आणि मला आशा आहे की आमचे चाहते पहिल्यासारखे कुर्बान हुआवर आपले प्रेम दर्शवतील.”

तेव्हा या आणि तुमच्या आवडत्या प्रमुख कलाकारांच्या आणि मालिकांच्या ह्या प्रवासात पुन्हा सामील व्हा दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजल्यापासून फक्त झी टीव्हीवर