आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा मृतदेह पाहून बेशुद्ध झाली पत्नी, एकत्रच निघाली दोघांची अंत्ययात्रा, अंत्यसंस्कारही एकाच सरणावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरैना - 70 वर्षांपूर्वी ते विवाहबंधनात बांधले गेले. एखाद्या नातेवाईकाकडे जायचे असो की कुठे प्रवासात कायम एकत्रच असायचे. शेवटी अखेरच्या वेळीही दोघांनी एकत्रितच जगाचा निरोप घेतला.  छोटेलाल शर्मा (90) आणि गंगादेवी (87) यांची ही कथा. दोघांनी एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांची अंत्ययात्राही एकत्रित निघाली आणि अंत्यसंस्कारही एकाच सरणावर झाला.  


नवऱ्याचा मृतदेह पाहून झाल्या बेशुद्ध 
पोरसा येथील राहणाऱ्या छोटेलाल शर्मा यांचे लग्न गंगादेवी यांच्याशी 70 वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर दोघांना चार मुले आणि सहा मुली झाल्या. छोटेलाल यांनी त्यांच्या सर्व मुलांचे लग्न केले. त्यांना नातवंडेही झाली. संपूर्ण कुटुंबाबरोबर ते आनंदाने जीवन जगत होते. शनिवारी सायंकाळी छोटेलाल यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी असल्याने गंगादेवी यांना त्यांच्या मृत्यूबाबत सांगितले नाही. पण रविवारी त्यांना याबाबत सांगण्यात आले. 


रविवारी सकाळी जेव्हा नातवंडे गंगादेवी यांना छोटेलाल यांच्या अंत्यदर्शनासाठी घेऊन आली तेव्हा गंगादेवी बेशुद्ध झाल्या. इतरांना त्यांना त्यांना सावरले. काही वेळातच छोटेलाल यांची अंत्ययात्रा सुरू झाली. अंत्ययात्रा घरापासून काही अंतरावरच गेली असेल तेवढ्यात गंगादेवींनीही प्राण त्यागला. 

 
एकाच सरणावर केले अंत्यसंस्कार 
गंगादेवींच्या मृत्यूबाबत समजताच कुटुंबीयांनी दोघांचा अंत्यसंस्कार एकत्र करण्याचा निर्णय घेतला. दोघांना एकाच सरणावर अंत्यसंस्कारासाठी ठेवले. त्यांचे हात एकमेकांच्या हाती देऊन दोघांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...