जाहिरात
जाहिरात
Home >> International

International

 • बीजिंग: चीनमधील शास्त्रज्ञांनी तिबेट सीमेवरून वाहणाया नद्यांच्या उगमस्थळांचे आणि त्यांच्या लांबीचे व्यापक अध्ययन उपग्रहांच्या माध्यमातून केले आहे. चिनी विज्ञान अकादमीच्या (सीएसएस) शास्त्रज्ञांनी ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहाची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे या अध्ययनात अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. या छायाचित्रांच्या विश्लेषणासह वैज्ञानिकांनी भारत-पाकिस्तानातून वाहणाया सिंधू आणि म्यानमारमधून वाहणाया साल्विन आणि इर्रावडीच्या प्रवाहांचे विवरणही एकत्रित केले आहे.सीएसएसअंतर्गत...
  August 25, 03:03 AM
 • बीजिंग - जगभर आपल्या ड्रगनच्या विळख्याने चिरडून टाकणाऱया चीनने परराष्ट्र नीती कशी आहे याचाच नमुना पुन्हा एकदा जगाला दिसून आला. गडाफी यांच्या राजवटीला अमेरिकेने पहिल्यापासून विरोध केला आहे. गेले चार महिने देशातील बंडखोर आंदोलक गडाफींच्या समर्थकांशी लढा देत आहेत. मात्र, त्यावेळी पडद्यामागून गडाफींची पाठराखण करणाऱया चीनने गडाफी यांची राजधानी त्रिपोलीतील सत्ता बंडखोरांनी हस्तगत केल्यानंतर चीनने प्रथम गडाफी यांच्या विरोधात मत व्यक्त करत तेथील सत्तांतर शांततेत व्हावे, असे म्हटले आहे....
  August 24, 04:49 PM
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) माजी अध्यक्ष डॉमिनिक स्ट्रॉस कान यांच्याविरोधात झालेले लैंगिक आरोप संबंधित महिला मागे घेतले असून न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे. संबंधित महिलेने वेळोवेळी जबाब बदलल्याने तिच्या तक्रार विश्वासार्ह वाटत नसल्याचे सांगत त्यांना आरोपातून मुक्त केले आहे.दरम्य़ान, दोन्ही पक्षात 'सेटलमेंट' झाल्याने त्या महिलेने खटला मागे घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कान यांना आरोपातून मुक्त केल्याने फ्रान्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक...
  August 24, 04:23 PM
 • बीजिंग- चीनच्या शास्त्रज्ञांनी ब्रह्मपुत्रा व सिंधू नदीच्या उगमस्थानाचे ठिकाण शोधून काढले आहे. ब्रह्मपुत्र नदीवर बांध घालण्याबरोबरच तिबेटमधील काही पाणी योजना पूर्ण करण्याबाबत एक बैठक झाली. त्यात या दोन नद्यांच्या लांबीबाबत एका उपग्रहामार्फत अभ्यास करण्यात येणार आहे. चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (सीएएस)च्या शास्त्रज्ञांनी दोन्ही नदीच्या उगमस्थानाबाबत अभ्यास केला आहे.ब्रह्मपुत्रा नदीच्या संपूर्ण मार्गावर चीनच्या सॅटेलाइट उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांच्या सहाय्याने...
  August 24, 12:12 PM
 • लंडन - नेहमी बिस्कीट आणि केकचा अल्पोपहार घेणा-या महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे एका अध्ययनात आढळून आले आहे. स्वीडनमधील ६०,००० महिलांच्या खाणपानविषय सवयींचा सलग १० वर्षे अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केवळ बिस्कीट किंवा केकच्या अल्पोपहारावर अवलंबून राहणा-या ३३ टक्के महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे या अध्ययनात आढळून आले आहे. आठवड्यातून तीनपेक्षा जास्तवेळा बिस्कीट आणि केकवरच अवलंबून राहणा-या ४२ टक्के...
  August 24, 12:08 AM
 • मेलबर्न - एकाच परिवारातील तीन व्यक्तींना गाडीखाली चिरडल्याप्रकरणी एका भारतीय टॅक्सी चालकाला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुरविंदर सिंग असे या टॅक्सी चालकाचे नाव आहे. सिंग यांनी गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणा-या एका कारला टक्कर दिली. त्यात टेक्स रेह, त्यांची पत्नी व बहिण सुजे यांचा मृत्यू झाला. ही घटना मॅटरेन येथे घडली. यात एका ७६ वर्षीय वृध्दाही जखमी झाली.
  August 24, 12:07 AM
 • बीजिंग - उत्तर पूर्वेतील हेलाँगजिआंग भागातील कोळसा खाणीत २६ मजूर अडकले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. हेंगताई कोळसा खाणीत ३२ मजुर काम करत असताना अचानक ही दुर्घटना घडली. या घटनेतील सहा मजुरांना वाचविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. मात्र २६ जण खाणीत दबले आहेत. दरम्यान, या अडकलेल्या मजुरांना वाचविण्यासाठी घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले आहे.
  August 24, 12:05 AM
 • न्यूयॉर्क - जागतिक नाणेनिधीचे प्रमुख स्ट्रॉस कान यांच्यावरील लैंगिक आरोपाचे प्रकरण रद्द करावे, अशी मागणी अभियोजन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.न्यायालय यासंदर्भातील निकाल बुधवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. कान यांच्यावर हॉटेल महिला कर्मचा-याकडून करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सरकारी वकिलाने म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण रद्दबातल ठरविण्याची विनंती करण्यात आली आहे. सदर महिलेने केलेल्या आरोपाला पुरेसा आधार दिसत नाही. बुधवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. उपलब्ध...
  August 24, 12:03 AM
 • वॉशिंग्टन - अफगाणिस्तानमधील एका गावात तालिबानी कमांडर व त्याच्या अंगरक्षकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. एका साठवर्षीय वृद्धाला अफगाणिस्तानचा एजंट समजून ठार केल्याबद्दल संतापलेल्या गावक-यांनी हे अमानुष कृत्य केले. यावरुनच अफगणिस्तानमध्ये तालिबान्यांविरोधात आता असंतोष पसरत असल्याचे दिसत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी हेल्मंड भागातील ट्रेक झाबेर या गावात घडली. यार मोहम्मद व त्यांची दोन मुले रमझाननिमित्त दिवसभर उपवास करून सायंकाळी मशिदीजवळ थांबलेले होते....
  August 24, 12:01 AM
 • लंडन - अभिनेत्री केट विन्सलेटने ब्रिटनमधील एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या ९० वर्षीय आईला चक्क आगीतून सुखरूप वाचविले. टायटॅनिक फेम केटचे या हिरोगिरीबद्दल सध्या हॉलीवूडमध्ये चर्चा आणि कौतुक होत आहे. नेकर बेटावरील ग्रेट हाऊसमध्ये ही घटना घडली. केट आपली दोन मुले व बॉयफ्रेंडसह या ठिकाणी उतरली होती. तिच्यासह एकूण २० पाहुणे या ठिकाणी होते. २२ ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास बाजूच्या इमारतीत अचानक आग लागली. याच इमारतीत ब्रान्सन हे पत्नी, मुलगा सॅम हे गाढ झोपेत होते. इमारतीतून आगीचे लोट येत होते....
  August 24, 12:00 AM
 • त्रिपोली - लिबियातील हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी पर्व संपले असा दावा बंडखोरांनी केला असला तरीही त्यांच्या राजवटीची धुगधुगी अद्याप कायम आहे.गद्दाफी पुत्र सैफ अल-इस्लामने आज त्रिपोलीच्या रस्त्यावर येत लढाई अद्याप संपली नसल्याचा दावा केला असून त्यानंतर पुन्हा गद्दीफी समर्थक व बंडखोरांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. दरम्यान, गद्दाफीने तत्काळ सत्ता सोडावी, अशी मागणी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. रविवारी रात्री त्रिपोलीत धडक मारल्यानंतर बंडखोर व राष्ट्रीय परिवर्तन परिषद...
  August 23, 11:55 PM
 • लंडन. ओसामा बिन लादेन याच्या पत्नीने जेलमध्ये गांधीगिरी सुरू केली आहे. आपल्यावर शस्त्रक्रिया करण्यास तिने स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकी कमांडोजनी लादेन याला ठार केल्यानंतर तीन महिन्यांनी हिला पाकिस्तानातून ताब्यात घेण्यात आले होते, असा दावा तिच्या भावाने केला आहे.इस्लामाबादपासून 50 किलोमीटरवर असलेल्या एबोटाबाद येथे अल कायदाचा म्होरक्या लादेन याच्या घरावर अमेरिकेने हल्ला चढवला होता. यावेळी लादेनची पत्नी अमल अल सदाह हिने लादेनला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. यावेळी तिच्या...
  August 23, 03:10 PM
 • लंडन. ब्रिटनमध्ये आलेल्या काही रशियन तरुणांनी कामांधपणाचा कळस गाठला. कोणालाही लाजेने मान खाली घालायला लावणारे कृत्य या तरुणांनी केले. रशियातून दोन आठवड्यासाठी इंग्लंडमध्ये आलेल्या बड्या धेंडाच्या मुलांनी एका मलेशियन तरुणीवर सतत अडीच तास सामूहिक बलात्कार केला. यावरच हे कामांध थांबले नाहीत, त्यांनी या बलात्काराचे शुटिंगही केले. आणि कळस म्हणजे बलात्काराला लाईव्ह कॉमेंट्रीही देऊन टाकली. पोलिसांनी या चारही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची जेलमध्ये रवानगी केली आहे.
  August 23, 02:53 PM
 • चीनमध्ये व्हिएतनामी वंशाच्या महिलांची खरेदी विक्री होत असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. सिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार किमान 100 व्हिएतनामी महिलांची चीनमध्ये जबरदस्तीने विक्री करण्यात आली आहे.या प्रकरणाची चौकशी करणा-या पोलिस सूत्रांनुसार या महिलांचे अपहरण करण्यात आले. इतकेच नाही तर त्यांची सुटका व्हायची असेल तर खंडणी द्यावी लागेल, असे फोन त्या महिलांच्या घरी करण्यात आले होते. मीडियातील वृत्तानुसार या अपहृत महिला हुनान प्रांतातील दुर्गम भागातील आहेत. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या एका...
  August 23, 02:34 PM
 • लंडन - हॅरी पॉटर अर्थात डॅनिअल रेडक्लिफ लवकरच रोसेन कोकर हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. गेल्या वर्षभरापासून हॅरीचे तिच्यासोबत डेटिंग सुरू होते. रोसेन हिची हॅरीच्या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका होती. हॅरीसोबत लग्न करण्यास तिला तिच्या वडिलांनीही परवानगी दिली आहे. हॅरी हा आता २२ वर्षांचा झाला आहे. हॅरी पॉटर शृंखलेतील त्याचा शेवटचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता व त्याला चांगले यशही लाभले होते. त्याचे वय आणि कारकीर्द पाहता त्याने इतक्या लवकर लग्नाच्या बेडीत अडकायला...
  August 23, 02:43 AM
 • वॉशिंग्टन - अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या धुम्रपान करण्याची सवय असते. परंतु सकाळच्यावेळी सिगारेट किंवा बिडी ओढल्यामुळे कॅन्सरचा धोका दुप्पट वाढतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या ऑनलाईन जर्नलमध्ये यासंदर्भात संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सकाळी विडी, सिगारेट ओढण्याची सवय असणारे लोक फुफ्फुस, मानेच्या कॅन्सरला बळी पडतात. डॉ. जोशुआ मस्कट यांच्या पथकाने याबाबत संशोधन केले आहे. सकाळी उपाशीपोटी धुम्रपान करणा-यांच्या पोटात निकोटिनचे प्रमाण जास्त असते.
  August 23, 01:48 AM
 • त्रिपोली - लिबियाचे सर्वेसर्वा मुअम्मर गद्दाफी यांच्या सैन्याचा पाडाव करण्यात बंडखोर व नाटो सैन्याला सोमवारी यश आले. राजधानीवर आता बंडखोरांनी पूर्ण ताबा घेतला असून या हल्ल्यात राष्ट्रपतींचा थोरला मुलगा सैफ अल इस्लाम याला अटक करण्यात आल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे. तहाची बोलणी करण्यास सरकार राजी झाले आहे. दरम्यान, ही घटना लोकशाही स्थापनेच्या दिशेने हे निर्णायक मानली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लिबियात लोकशाहीवादी बंडखोर व गद्दाफी सैन्य यांच्यातील संघर्ष सुरू आहे. दोन...
  August 23, 12:19 AM
 • वॉशिंग्टन - आनंदी राहणा-या लोकांपेक्षा निराश व्यक्तींची स्मरणशक्ती अधिक तीव्र असते, असे एंगलिया रस्किन विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.माणसाची मन:स्थिती मेंदूला कशा पद्धतीने प्रभावित करते हे संशोधनातून दिसून येईल. नैराश्यावर इलाज करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या आधी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये निराशावस्थेत शब्दांची सूची आठवण्यात अडचणी येतात, असे दिसून आले होते. यावरील अधिक संशोधनानंतर नवे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. ८८ विद्यार्थ्यांना वेगवेगळी...
  August 23, 12:16 AM
 • बीजिंग - भारतीय संस्कृती आणि पांडू लिपी यांचे अतूट नाते आहे. प्राचीन संस्कृतीचा उलगडा करणा-या ५० हजार पानांचे तिबेटमध्ये जतन करण्यात आले आहे. भारतात हे लेखन करण्यात आले असून त्यासाठी खजुराच्या पानांचा वापर करण्यात आला आहे. शेकडो वर्षांपूर्वीचे हे लेखन संस्कृत भाषेतील आहे. या प्राचीन दस्तऐवजाची नोंदणी चीन सरकारने २००६ मध्ये केली. या कागदपत्रांची फोटोकॉपी काढण्यात आली आहे. पांडू लिपीव्यतिरिक्त प्राचीन भारतीय भाषेतील दस्तऐवजांचेही चीन सरकारने जतन केले आहे, असे सेवांग जिगम यांनी...
  August 23, 12:14 AM
 • नवी दिल्ली - जगातील सर्वात लहान कोंबडीचे अंडे सापडल्याचा दावा अमेरिकेतील एका नागरिकाने केला आहे. डॉनी सरेल असे या नागरिकाचे नाव असून गेल्या महिन्यात वेस्ट व्हर्जिनियातील शेतात त्याला हे सर्वात लहान कोंबडीचे अंडे सापडल्याचा दावा त्याने केला आहे. २.१ सेंटिमीटर लांब आणि ३.४६ ग्रॅम वजनाचे हे अंडे आहे. म्हणजेच या अंड्याचा आकार पन्नास पैशाच्या नाण्याएवढाच आहे. रसेल सांगतो, खरंच हे अंडे खासच आहे. तुम्हाला जर सत्य जाणून घ्यायचे असेल तर ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्याची पत्नी प्राणिप्रेमी...
  August 23, 12:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात